Share

Airports Authority of India Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात इंजिनीअर, डिप्लोमा, ITI धारकांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या भरतीचा तपशील

Airports Authority of India Bharti 2025 :  भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘एएआय’ अंतर्गत विविध अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ असणार आहे.

या भरतीअंतर्गत एकूण १९७ रिक्त पदे उपलब्ध आहेत. भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव जागा
पदवीधर अप्रेंटिस ३३
डिप्लोमा अप्रेंटिस ९६
ट्रेड अप्रेंटिस ६८

शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर अप्रेंटिस – अभियांत्रिकीमधील पूर्णवेळ चार वर्षांची पदवी.

  • डिप्लोमा अप्रेंटिस – अभियांत्रिकीमधील डिप्लोमा (चार वर्षांची पदवी आवश्यक).

  • ट्रेड अप्रेंटिस – ITI (NCVT) मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

११ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

पगाराचा तपशील :

  • पदवीधर अप्रेंटिस – ₹१५,०००/- (₹१०,५००/- एएआयकडून + ₹४,५००/- इतर हिस्सा)

  • डिप्लोमा अप्रेंटिस – ₹१२,०००/- (₹८,०००/- एएआयकडून + ₹४,०००/- इतर हिस्सा)

  • ट्रेड अप्रेंटिस – ₹९,०००/- (पूर्ण रक्कम एएआयकडून)

महत्त्वाची माहिती :

  • परीक्षा फी : कोणतीही फी नाही

  • अर्ज प्रक्रिया : फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील

  • शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२५

महत्त्वाचे लिंक :

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now