श्रीमंतांच्या गाडीला ८ एअरबॅग, आणि सर्वसामान्यांच्या २ एअरबॅग का? गडकरींनी कंपन्यांना खडसावले

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक अभ्यासू मंत्री म्हणून देशात ओळखले जातात. एका मुलाखतीत ते म्हणाले की, लहान आणि स्वस्त कारमध्ये अधिक एअरबॅग्ज पुरवण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. यामुळे अनेक लोकांचे जीव वाढतील. मात्र सेफ्टी नियमांची अमलबजावणी याबाबत वाहन उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे.

यामुळे मात्र गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. मात्र सुरक्षा मिळणार आहे. गडकरी म्हणाले, कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ श्रीमंतांच्या महागड्या कार्समध्ये आठ एअरबॅग्स उपलब्ध करुन देतात. मात्र जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिक लहान कार खरेदी करतात.

या कार्समध्ये मात्र केवळ दोनच एअरबॅग्स असतात, काहींमध्ये तर नसतातच. यामुळे गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता त्यांनी या कारमध्ये देखील जास्त एअरबॅग्स असाव्यात अशा सूचना देखील त्यांनी केली आहे. यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे.

लोअर मीडल क्लास नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेत असतात. यामध्ये जास्त एअरबॅग नसल्यास अपघात झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मी सर्व कार उत्पादकांना आवाहन करतो की वाहनाच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये किमान 6 एअरबॅग दिल्या जाव्यात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

यामुळे सर्वसामान्य लोकंही सुरक्षित प्रवास करु शकतील. आणि अपघातात मृत्यू होणारांची संख्याही कमी होईल. गाडीत एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग ३ हजार ते ४ रुपयांनी वाढेल. मोठ्या प्रमाणावर यासाठी खर्च येणार नाही.

यामुळे मात्र आपला जीव वाचेल. यामुळे मोठ्या श्रीमंत व्यक्तींसाठी जशी सुरक्षितता घेता तसेच सर्वसामान्य नागरिक वापरतात त्यांना देखील हीच सुरक्षा द्या, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. यामुळे वाहन उद्योजकांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.