मुंबई इंडियन्सची हवा! वर्ल्डकपसाठी टिम इंडीयात मुंबई इंडियन्सच्या तब्बल ६ खेळाडूंची निवड

मुंबई। ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची बुधवारी ( दि. ८ सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड झालेल्या या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक खेळाडू असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या धडाकेबाज मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमध्ये सुर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि राहुल चहर यांचा समावेश करण्यात आला आहे.

राहुल चहरने गेल्या काही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघासाठी राहुल चहर हा चांगला पर्याय असल्याचे समजले जात होते. व अखेर त्याची निवड झाली आहे.

त्याचबरोबर बोलायचे झालेच तर राजस्थान रॉयल्सच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळालेली नाही. पंजाब किंग्जचे २, दिल्ली कॅपिटल्सचे ३, चेन्नई सुपर किंग्जचे ३ खेळाडू संघात निवडले गेले आहेत. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील १-१ खेळाडूची संघात निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे आता विश्वचषकाच्या संघातही आपल्याला मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक खेळाडू दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतात खेळली न जात आता ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान आयोजित करण्यात आलीय.

वर्ल्डकपसाठी करण्यात आलेल्या ग्रुप बी मध्ये भारताचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील.ग्रुप बी मधील पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल.
महत्वाच्या बातम्या
सगळा रस्ता कंडोंमने भरलाय! हायवेर कंडोमचा खच पाहूण उडाली खळबळ 
लंडनची मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी आले; आता गायी म्हशींच्या व्हिडीओतून महिन्याला ५ लाख कमावतात 
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा.. 
मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले! ऑलिम्पीक विजेत्यांसाठी स्वत: जेवन बनवत, स्वतःच्या हाताने जेऊ घातले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.