हवाई दल म्हणाले, धावपट्टीला दीड वर्ष लागतील; गडकरी म्हणाले, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो…

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामांसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे रस्ते विभाग असल्याने त्यांनी रोडची कामे करण्यात अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते ती गोष्ट लगेच उरकतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राजस्थानच्या बाडमेर राष्ट्रीय हायवे-९२५ वर आपत्कालीन लँडिंग स्ट्रिपचे उद्घाटन नुकतेच पार पडले.

यावेळी नितीन गडकरी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत. सशस्त्र दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी दीड वर्ष नव्हे, अवघ्या १५ दिवसांत आम्ही जबरदस्त धावपट्टी बांधून देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांना त्यांनी शब्द दिला आहे.

इमर्जन्सी लँडिंग फील्ड तयार करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागतो, असे भदौरिया यांनी सांगितले. मात्र आम्ही तुम्हाला १५ दिवसांत उत्तम गुणवत्तेची धावपट्टी तयार करुन देऊ, असे नितीन गडकरी कार्यक्रमात म्हणाले. यामुळे गडकरी यांच्या कामाच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

देशात पहिल्यांदाच एका हायवेचा वापर भारतीय हवाई दलाकडून सशस्त्र विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाणार आहे. याचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोविड-१९ चे संकट असतानाही देशात दरदिवशी ३८ किमी लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले होते.

असे अनेक विक्रम केल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. पुढील काही वर्षात भारतात परदेशातील रस्त्यासारखे रोड बघायला मिळतील, असेही गडकरी यांनी सांगितले होते. यामुळे विकासात मोठी भर पडणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.