कोरोनाच्या संकटात देशाच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाचे उड्डाण; औषधे, वैद्यकीय कर्मचारी एअरलिफ्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत राज्यांकडून केंद्राकडे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी केला जात आहे. त्यामुळे अशा संकट काळात भारतीय हवाई दलाने केंद्राच्या मदतीला धाव घेतली आहे.

भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन कंटेनर्स, सिलेंडर, महत्वाची औषधे, साहित्य, तसेच कोरोनाला लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले जात आहे. अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दिल्लीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कामासाठी रुग्णालय उभे करण्यासाठी आम्ही कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बंगळुरुतून डॉक्टर आणि नर्सेस यांना एअरलिफ्ट केले आहे. तसेच त्यांच्यासोबतच बंगळूरु येथून ऑक्सिजन कंटेनर्स सुद्धा एअरलिफ्ट करण्यात आले आहे, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

तसेच कोरोनाविरोधातील लढाईत वेगाने वाहतूक करत भारतीय हवाई दल मदत आहे. वैद्यकीय कर्मचारी, महत्वाची सामग्री आणि औषधे देशभरातील कोरोना रुग्णालयांमध्ये पोहचवण्याचे काम सुरु आहे, असे ट्विट भारतीय हवाई दलाने केले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे वेगवेगळ्या राज्यात ऑक्सिजचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या संकटात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केंद्र सरकारला मदतीचा हात दिला आहे. ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टाटा ग्रुप परदेशातून २४ मोठे कंटेनर आयात करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता
किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.