Share

नगरच्या शेतकऱ्याची लेक आता महिला आयपीएल गाजवणार; गावातच घेतलेत क्रिकेटचे धडे

येत्या २३ मे पासून भारतामध्ये महिलांचं आयपीएल सुरु होणार आहे. या आयपीएलची सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या आयपीएलसाठी अहमदनगर(Ahemadnaga) जिल्ह्यातील पाथर्डी भागातील एका मुलीची निवड झाली आहे. या मुलीने कठीण प्रसंगातून मार्ग काढत संघर्ष करून आयपीएल स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.(ahmadnagr girl selectrd for women’s IPL)

या मुलीवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिलांच्या आयपीलसाठी निवड झालेल्या या मुलीचे नाव आरती शरद केदार असे आहे. आरतीचा जन्म पाथर्डी तालुक्यातील हात्राळ या गावात झाला. तिला लहापणापासून क्रिकेटची आवड होती. आरतीला क्रिकेटसाठी शशिकांत निर्हाळी सरांकडून मार्गदर्शन लाभले आहे.

यासंदर्भात माहिती देताना आरती केदार म्हणाली की, “मी आयपीएलसाठी सिलेक्ट झाली आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे. मी गेल्या सात वर्षांपासून एस वी नेट अकादमीत क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे आणि सराव देखील करत आहे. मी शशिकांत निर्हाळी सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले आहेत”, असे आरती केदारने सांगितले आहे.

आरती केदार पुढे म्हणाली की, “या अकादमीत शशिकांत निर्हाळी सर सर्व मुलींना मोफत क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. सध्या या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या चार मुली राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत. मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे आणि भारताला वर्ल्डकप जिंकून द्यायचा आहे”, असे आरती केदारने सांगितले आहे.

“माझे आई वडील शेती करतात. त्यांचा मला पाठिंबा आहे. ग्रामीण भागातील मुली खेळण्यासाठी घरातून बाहेर पडत नाहीत. मला त्या मुलींना असं सांगायचं आहे की कोणताही खेळ खेळण्यासाठी घरातून बाहेर पडा. फिटनेससाठी हे फार महत्वाचं असतं. तुमचं एखाद्या खेळात करिअर झालं नाही तरी तुमचा फिटनेस चांगला राहतो”, असे आरती केदारने म्हणाली आहे.

२३ मे पासून महिलांच्या आयपीएल स्पर्धेला सुरवात होणार आहे. २३ मे ते २८ मे दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यात होणार आहेत. फक्त अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. बीसीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सध्या प्रेक्षकांचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं अभिनेत्री रवीना टंडनकडून समर्थन? ट्वीट तुफान व्हायरल
मित्राच्या लग्नात पत्नीसोबत डॅशिंग अंदाजात पोहोचला KGF स्टार यश, पहा जबरदस्त फोटो
नवा चित्रपट फ्लॉप होताच महेश बाबूचा बदलला सूर; म्हणाला, बॉलीवूड चित्रपट करायला हरकत नाही

ताज्या बातम्या खेळ राज्य

Join WhatsApp

Join Now