आजींचा नादच करू नका! युट्युबवर ६.५ मिलियन सब्सक्राईबर आणि महिन्याला दोन लाख उत्पन्न

अहमदनगर | युट्युबवर व्हीडिओ टाकून चॅनेल चालू करून पैसा कमविणे सोपे काम नाही. कारण त्यासाठी आपल्या व्हीडिओमध्ये काहीतरी खास असायला हवे. ७० वर्षांच्या आजी ज्या कधीही शाळेत गेल्या नाहीत त्यांचे आज ६.५ लाख सब्सक्राईबर आहेत.

महिन्याला त्या दीड ते दोन लाख रुपये सहज कमवतात. या आजी पारंपरिक मसालेदार महाराष्ट्रीयन पदार्थ बनवतात. अहमदनगर दहा किलोमीटर लांब असलेल्या सारोळा कासार गावात त्या राहतात. त्या आजींचे नाव सुमन असे आहे.

त्यांना हिंदी बोलता येत नाही. आतापर्यंत त्यांनी १५० पेक्षा जास्त व्हिडिओज युट्युबला शेअर केल्या आहेत. नातवाने त्यांना हा युट्युब चॅनेल सुरू करण्याची आयडिया दिली. पण पुढे असे काही होईल त्यांनी विचारही केला नव्हता.

त्यांचा नातू यश म्हणाला की, अकरावीत यावर्षी जानेवारीत मी आजीला पावभाजी बनवण्यासाठी सांगितली होती पण तिला पावभाजी बनवता येत नव्हती. मग मी आजीला युट्युबवर काही व्हीडिओ दाखवल्या तेव्हा ती म्हणाली की मी याच्यापेक्षा चांगली पावभाजी बनवू शकते.

आजीने खरंच खूप चांगली पाव भाजी बनवली होती. सगळ्यांना ती खूप आवडली मग माझ्या मनात युट्युब चॅनेल सुरू करण्याचा विचार आला. नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही युट्युब चॅनेल खोलला होता त्यानंतर आम्ही कारल्याची भाजी बनवण्याचा व्हीडिओ शेअर केला.

त्याच व्हिडिओला काही दिवसांत १ मिलियन लोकांनी पाहिले. आता त्या व्हिडिओला ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आहेत. जेव्हा युट्युब चॅनेल सुरू करण्याचे ठरले होते तेव्हा आजी खूप घाबरल्या होत्या कारण त्यांना यातले काहीच माहीत नव्हते.

आजींनी कधीही कॅमेऱ्याचा सामना केला नव्हता पण नंतर त्यांना हळू हळू सवय झाली. त्यांना युट्युब क्रिएटर अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांना सर महिन्याला दीड ते दोन लाख उत्पन्न मिळते.

युट्युबकडून त्यांना सिल्व्हर प्ले बटनदेखील मिळाले आहे कारण त्यांचे ६.५ मिलियन सब्सक्राईबर आहेत. आजींना काही इंग्रजी शब्द येत नव्हते जसे की केचअप, मिक्सर, बेकिंग पावडर इ. हे सर्व शब्द त्यांना त्यांच्या नातवाने शिकवले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

..आणि पोस्टमार्टेम सुरू असताना उठून बसला मृतदेह; कर्मचारीही घाबरून पळून गेले

शिवसेनेने केले अजान स्पर्धेचे आयोजन; भाजपने उठवली टिकेची झोड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.