एकाचवेळी ४२ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार, अहमदनगरमधील मन सुन्न करणारी घटना

 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण भेटत असून अनेक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे, अशात काही धक्कादायक घटना पण घडताना दिसून येत आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये गुरुवारी एकाचवेळी ४२ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. काल रात्री अमरधाम या स्मशानभुमीत त्या ४२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, गुरुवारी जिल्ह्यात २२३३ रुग्णांना कोरोना झाल्याची उच्चांकी नोंद झाली आहे, असे असताना रुग्णांच्या मृतांचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे.

अशात काल एकाच दिवशी ४२ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला, त्यानंतर त्यांना अमरधाममधील स्मशानभुमीत आणण्यात आले होते, तिथे एकाचवेळी ४२ मृत देहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामध्ये २ विद्युत दाहीनीमध्ये २० आणि उरलेल्या मृत देहांवर लाकडाच्या सरणावर ठेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी तिथे कठोर निर्बंध सुद्धा लादण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व जनतेने कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

सलमान खानने वाचवला होता दिया मिर्झाच्या आईचा जीव; ट्विट करत दियाने मानले आभार

रेखाच्या भांगेतल सिंदूर पाहून जया बच्चनने रेखाच्या कानाखाली वाजवली होती; वाचा पुर्ण किस्सा..

पैशांची कमी नाही तरी या गावातील लोक कपडेच घालत नाहीत, पर्यटकांनाही कपडे काढूनच जावे लागते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.