शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनातच फूट पडल्याचे चित्रं आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतली असून आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन संघटनांनी अचानक आंदोलनातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी आंदोलनासाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

या आंदोलनातून भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघाने आपले आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. ‘दिल्लीत काल जे काही घडलं यानं मला खूपच दुःख झाले. त्यामुळे आम्ही ५८व्या दिवशी आमचं आंदोलन थांबवत आहोत,’ असे भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानूप्रताप सिंह म्हणाले.

तसेच व्ही.एम. सिंग यांनी सांगितले की, ‘हमीभाव मिळाल्यास आम्ही निघून जाऊ. आम्ही येथे लोकांना मारहाण करण्यास आलो नव्हतो. मात्र लाल किल्ल्याची तिरंग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाचीही होती, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काल या कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले.

महत्त्वाच्या बातम्या
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल
बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत
‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.