देशात आणि राज्यात प्रथमच जय जवान,जय किसान हा नारा खर्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवण्याच काम सातारा जिल्ह्यातील खिंगर येथील शेतकऱ्याच्या पुत्रांनी केले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक पुतळे बघितले असतील. पण हा आगळावेगळा पुतळा पाहून तुम्हीही देखील चकित व्हाल. शेतकरी पुत्रांनी वडिलांचा पुतळा उभारला आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवासमान मानलं जातं. आपण पाहत असतो आई-वडील मुलांसाठी अफाट कष्ट करून पालन पोषण करत असतात. किसान दुधाने हे एकेतकरी होते. त्यांनी प्रचंड मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला आणि मुलांना मोठ केलं. त्यांना मुले आहेत. किसान दुधाने यांनी शेती(agriculture) करून आपल्या संसाराचा गाडा हाकला.
तसेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार देखील केले. मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून किसान दुधाने यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या कष्टकरी बापाची आठवण म्हणून मुलांनी किसान दुधाने यांचा पुतळा उभारला आहे. अनिल, संजय आणि धनंजय अशी या तीन भावंडांची नावे आहेत. या तिघांनी मिळून किसान दुधाने यांचा बैलजोडीसह पुतळा उभारला आहे.
यावर बोलताना त्यांच्या मुलाने सांगितले की, आम्ही घरातुन बाहेर पडताना आणि घरात परत येताना. आमचे वडील आम्हाला दिसले पाहिजेत. कारण आमचे वडील आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून आम्ही हा पुतळा बांधला आहे.
कृषी क्षेत्राच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी आपली ओळख जगाला पटवून दिली. त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी जवळील खिंगरसारख्या दुर्गम भागात परिस्थिती बेताची असताना सोन्यासारखी शेती फुलवली. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही हा पुतळा बांधला आहे, अशी माहिती अनिल दुधाने यांनी दिली आहे.
दरम्यान, किसान दुधाने यांची गावात ‘भाऊ’ म्हणून ओळख होती. ते नेहमी शेतात नवनवीन प्रयोग करत असायचे. त्यातून मिळालेले धडे ते इतर शेतकऱ्यांना देत. तसेच अडचणी असणार्या शेतकर्यांना ते कायम मदत करायचे. स्ट्रॉबेरी पिकावर केलेल्या संशोधनाबाबत महाराष्ट्र शासनाने व विविध संस्थांनी किसान दुधाने यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
बच्चू कडूंचे दिवस फिरले! ‘या’ गुन्ह्यात कोर्टाने ठोठावली दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन् केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी