केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ योजना’ जाहीर केली होती. या योजनेला बिहारमध्ये विरोध केला जात आहे. बिहारमधील जहानाबाद आणि नवादा या ठिकाणी तरुण विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी(Student) वाहनांवर दगडफेक देखील केली आहे. (agnipath scheme student angry on central goverment)
देशाचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर भरतीसाठी बुधवारी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर आज बिहारमध्ये ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी बिहारमधील अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्या थांबवल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी महामार्गावर अनेक ठिकाणी टायर जाळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेहानाबादमध्ये नॅशनल महामार्गावर विद्यार्थ्यांनी टायर जाळत आंदोलन केले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बिहारमधील मुंगेरमध्ये विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ‘अग्निपथ’ योजनेविरुद्ध निदर्शने केली आहेत. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ देखील केली आहे.
त्यामुळे जमालपूर मुंगेर महामार्गवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बक्सरमध्ये आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक जॅम केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे डब्यांना आग लावली आहे. तसेच बिहारमधील काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली आहे.
बिहारमधील मुझ्झफरपूर आणि बेगुसरायमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर वाहतूक अडवत तोडफोड देखील केली आहे. राजस्थान आणि उत्तरप्रदेशमधील काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी केंद्र सरकाराच्या ‘अग्निपथ’ योजनेविरुद्ध आंदोलन केले आहे.
“केंद्र सरकारची ‘अग्निपथ योजना’ तरुणांसाठी योग्य नाही. या योजनेमुळे फक्त चार वर्षांसाठीच लष्कर भरती केली जाणार आहे. त्यामुळे या चार वर्षात आमचे काय होणार? आम्हाला पेन्शन सुविधा देखील मिळणार नाहीत”, अशा भावना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या आंदोलनामुळे बिहार राज्यातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
..त्यामुळे मला रानबाजारमध्ये नाईलाजाने सिगरेट ओढावी लागली, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा
कौतुकास्पद! वडिलांचं निधन झाल्यानंतर नाही ठेवलं जेवण, त्याच पैशातून नदीवर बांधला पूल
क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा