कोरोना काळात पोटासाठी वृद्धेची कसरत; ‘तो’ विडिओ शेअर करत रितेश देशमुख म्हणाला….

मुंबई । सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये कोणाचे काम बंद, तर कोणाचे पगार कापले आहेत. यामध्ये अनेक लोकांची नोकरी देखील गेली आहे.

हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Warrior Aaji

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

अभिनेता रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपले कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखने या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी असे म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.