एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे सर्व शाळा, महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याचा फटका MPSC च्या उमेदवारांना देखील बसला आहे. परंतु यावर्षीही पुन्हा मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीची सूर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संतप्त विद्यार्थांनी रास्ता रोको केले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी सौम्य लोठीमार देखील केला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या वेळी कोरोना नव्हता का?  असा सवाल विद्यार्थ्यांनी सरकारला केला आहे.

परीक्षासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले त्यांनी रस्त्यावरच ठिय्या सुरू केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले. त्यांनी एमपीएससी परिक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
“अंबानीच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपनेच ते षडयंत्र रचलं”
उदयनराजेंनी दिली विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी
“कुणीही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही; सर्वांना मोबाईल पाठवतोय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.