अग्गंबाई सुनबाईमध्ये कलाकाराने शिलाई मशीनला मारली लाथ; शिंपी समाज झाला आक्रमक

झी मराठीवरील अग्गंबाई सुनबाई ही मालिकेने काहीच महिन्यात लोकांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असतानाच ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या मालिकेतील एका दृष्यामध्ये कलकाराने शिलाई मशीनला लाथ मारल्याने शिंपी आणि टेलरिंग काम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावण्यात आल्या आहे. असे म्हणत शिंपी समाजाने मालिकेच्या लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा निषेध केला आहे.

गुरुवारी अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या एका भागामध्ये हे दृश्य दाखवण्यात आलेले आहे. या मालिकेत महत्वाची भुमिका बजावणारे अभिनेते अद्वैत दादरकर यांनी समस्त शिंपी समाजाच्या उपजिवीकेचे साधन असलेल्या शिलाई मशीनला लाथ मारण्याचे दृश्य दाखवण्यात आलेले आहे.

शिलाई मशीनला लाथ मारल्याने शिंपी समाजाचे आराध्य दैवेत संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे. असे म्हणत शिंपी समाजाच्या वतीने या मालिकेच्या लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि झी टिव्हीचा अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेतर्फे जाहीर निशेष केला आहे. दिग्दर्शक आणि झी टिव्हीने समस्त शिंपी समाजाच्या टिव्हीच्या माध्यमातून माफी मागावी अशी मागणी केली आहे.

तसेच जर माफी मागितली नाही, तर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची पुर्ण जबाबदारी मालिकेचे लेखक, दिग्दर्शक आणि झी टिव्हीची राहिल, असा इशारा शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागूल, संजय खैरनार, आर. टी सोनवणे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

त्रिदेव, विश्वात्मा चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज करते ‘हे’ काम
मल्ल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहेत मोहनलाल; बुर्ज खलिफामध्ये आहे घर
देवमाणूस! बाळ सारखं रडत होतं, बाळाला शांत करण्यासाठी डॉक्टरने गायलं गाणं; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.