‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवीन वळण; आसावरीला कळणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याविषयी?

सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या पाहायला मिळतात. त्यातीलच झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेला सध्या खूपच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजित राजे, शुभ्रा, सोहम, आजोबा, ही सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना आवडतात.

सध्या ‘अग्गबाई सूनबाई’ मालिका एका नवीन वळणावर आहे. या मालिकेत नवीन पर्वापासून घराची सूत्र आसावरीने हाती घेतले आहे. तसेच तिच्या या बिजनेसमध्ये सोहम तिचा राईट हॅन्ड बनला आहे. तर अभिजित राजे यांनी घराची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे असे दाखवण्यात आले आहे.

मालिकेत नवीन पात्र अनुराग म्हणजेच अभिनेता चिन्मय उदगीरकर याची एंट्री पाहायला मिळाली. तसेच सतत बबडूच्या काळजीत असलेली शुभ्रा किवा मी करते ते बरोबर की नाही हा भाव सतत मनात ठेवणारी आता बदललेली पाहायला मिळेल. तिचा आत्मविश्वास आता परत आला असून तिने डीबीके फूड्स जॉईन केलं आहे.

मालिकेत सुझॅन सोहमशी प्रेमाच खोट नाटक करत असून तिला त्याच्याकडून त्याची संपत्ती, पैसा बळकवायचा आहे. हे सगळ शुभ्राच्या लक्षात येत आहे. त्यामुळे शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे. सुझॅन शुभ्राला हाकलून देऊन घरावर राज्य करण्याच स्वप्न पाहत आहे.

शुभ्रा तिची खोड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सुझॅनला जर हे घर आपलंस करायचा असेल तर या घरातील सुनेची सर्व कामं देखील करावी लागतील असं म्हणून शुभ्रा तिला कामाला जुंपते. तिच्याकडून घरची सर्व कामं करून घेते. एवढ करून देखील सुझॅनची अक्कल ठीकाणावर येईल कि ती पुन्हा शुभ्राला त्रास देण्यासाठी काही नवीन प्लांनिंग करणार? आसवारीला कश्या पद्धतीने सोहमचे सत्य कळणार ? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

तसेच शुभ्राला आसावरी ऑफिसमध्ये काम करण्यास सांगते आणि शुभ्राही या गोष्टीसाठी तयार होते. ते तिच ऑफिसमध्ये मोठ्या जल्लोषाने स्वागत करतात. आसावरी तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवते आणि अनेक निर्णय तिला घेण्याची मुभा देते.

हे सर्व पाहून सोहम आणि सुझॅनची जळफळाट होते. आता सोहम आणि सुझॅन ऑफिस मध्ये शुभ्राला कोणत्या प्रकारचे त्रास देतील आणि तिला ऑफिसच्या कामातून कसे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.

हे ही वाचा-

जेनेलियासोबत रोमान्स करता करता रितेशने केला दुसऱ्याच कोणाला किस; पहा पुढे काय घडलं..

शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकासोबतच..; आजी आजोबांचा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येईल

रोहित शेट्टी बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर झाले होते फिदा; पत्नीला सोडण्याची केली होती तयारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.