प्रेक्षकांचा निरोप घेताना ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम बबड्या झाला भावूक, म्हणाला…

मुंबई | झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकाने कमी काळातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने उत्कृष्ट भूमिका निभावल्या आहेत. मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने आणि बबड्याची भूमिका अभिनेता आशूतोष पत्कीने साकारली आहे. या जोडीने चाहत्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

अग्गंबाई सासूबाई मालिका लवकरचं निरोप घेणार आहे. पण मालिकेच्या जागी ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरचं येणार आहे. नवीन मालिकेत अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र बबड्या आणि शुभ्रा ही जोडी बदलण्यात आली आहे. त्यांच्या जागी उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर भेटीला येणार आहेत.

मालिकेच्या निरोपानंतर बबड्या उर्फ आशूतोष पत्कीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. बबड्याने मालिकेत काम करत असताना नवीन शिकायला मिळालं, कलाकारांसोबत काम करत असताना त्यांनी सांभाळून घेतलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

बबड्याने त्याच्या चाहत्यांचेही मनापासून आभार मानले आहेत. मालिकेचं पर्व संपताना प्रवास आठवतोय, सर्वांची खुप आठवण येईल, लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येईन. असं आशूतोष पत्कीने म्हटलं आहे.

 

 

अभिनेता आशूतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत त्याच्या ‘बबड्या’ या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. सोशल मिडियावर बबड्याच्या भन्नाट मिम्सने धूमाकूळ घातला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबई महानगरपालिकेत काम करणारा संदेश कसा झाला टेलिव्हिजनवरील सज्जनराव? जाणून घ्या प्रवास
धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दोन भावांची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या
उदयनराजेंनी दिली विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी, विरोधकांनी हल्ला केल्याचा आरोप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.