वयात काय असतं, आजही आहे तोच अंदाज आणि तीच अदा; ऐश्वर्या नारकरचा बोल्ड फोटोशूट..

मुंबई । अलीकडच्या काळात मालिका, नाटक, चित्रपट यामधून सर्वांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. तिने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत असून वय हा केवळ आकडाच आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. यामुळे ती चर्चेत आली आहे.

या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. मराठीच नव्हे तर ऐश्वर्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग देखील आहे. ती कायम सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून त्यातील काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. यामुळे तिचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऐश्वर्या ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक ठिकाणी तिने कामे केली आहेत.

यामध्ये तिने अपराध, धडक, अंकगणित या चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रीमंता घरची सून, स्वामिनी, ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी अशा अनेक मालिकेत देखील ती झळकली आहे. यामुळे ती लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ती आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज करते. वयात काय ठेवलंय आजही ती तरुण अभिनेत्रीसारखी दिसते. या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत असून वय हा केवळ आकडाच आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, यामुळे या फोटोची चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.