राज्यात आणखी १५ दिवसांचे लॉकडाऊन होणार; राजेश टोपे यांचे सुचक वक्तव्य

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला होता. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करत, नागरीकांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते.

त्यामुळे राज्यभरात त्याच्या चांगला परिणाम दिसून आला आहे. अशातच पुन्हा राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्यात येणार आहे की नाही, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक सुचक विधान केले आहे.

राज्यात आणखी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरु आहे. राज्यात १५ दिवसांचा अधिक लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे, पण अजून निर्णय व्हायचा आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी पुढच्या लॉकडाऊनबाबत हे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे १ जुनपासून पुन्हा १५ दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी हे म्हटले आहे.

राज्यातील पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळे १५ दिवसांचा आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे. तसेच गर्दीचे सर्वच कार्यक्रम बंद आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्या जिल्ह्यात शिथिलता देण्यात येईल, असेही राजेश टोपे म्हणाले आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट आता कुठे शांत होत असताना, आता राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण भेटत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावे, असे आवानही केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे राजीनामा देण्याची शक्यता
एकीचे बळ! मधमाश्यांनी उघडले प्लास्टीकच्या बाटलीचे झाकण, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.