Cricket : नुकतीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची टी-२० मालिका पार पडली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तर दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ट्रॉफी मिळवली आहे.
मालिकेचा दुसरा सामना हा नागपुरात खेळला गेला. यात भारताने ६ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तसेच तिसरा सामना हा काल (रविवार) हैद्राबादमध्ये पार पडला. यावेळी टीम इंडियाने १८७ धावा करत सहा विकेट्स राखून ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला.
रविवारी झालेल्या हैद्राबाद येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी १८६ धावा करत ७ विकेट्स गमावल्या. त्यांनतर हार्दिकने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूत चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला ९ धावांची गरज होती. त्यावेळी दिनेश कार्तिकने मैदानात उतरून दोन चेंडूंमध्ये १० धावा घेत भारताला जिंकवले. आता रविवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने ४ विकेट्स गमावत विजय मिळवला आहे.
या सामन्यात विराट कोहलीने ६३ तर, सूर्यकुमार यादवने ६८ धावा करत मैदान गाजवले. विजय प्राप्तीनंतर कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफी स्वीकारली. त्यांनतर रोहित शर्माने ती ट्रॉफी दिनेश कार्तिकच्या हातात दिल्याचे वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. एखादा सामना जिंकल्यानंतर मिळालेली ट्रॉफी ही फोटोसेशनच्या वेळी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे दिली जाते. धोनीने ही परंपरा सुरु केली होती.
मात्र, यावेळी ती ट्रॉफी संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकच्या हातात होती. रोहित शर्माने ती ट्रॉफी वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकच्या हातात दिली, तर संघातील सर्वात युवा खेळाडू ऋषभ पंत हा एका बाजूला उभा होता. त्यामुळे रोहित शर्माने धोनीने सुरु केलेली परंपरा मोडली असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
अखेर तो दिवस आलाच! दिनेश कार्तिकला मिळाले टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद, हार्दिक पंड्याला डच्चू
टीम इंडियातील फ्लॉप क्रिकेटर्सच्या बायका आहेत खुपच सुंदर, बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील फिक्या
स्टार वेगवान गोलंदाज वाचवणार टीम इंडियाची इज्जत; पुढच्या सामन्यात संधी नक्की मिळणार
Nagpur Cricket ground : थेट क्रिकेटच्या मैदानावरच घुमला ‘५० खोके एकदम ओके’चा आवाज; वाचा नक्की काय घडलं