Share

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर प्रेक्षकांची विवेक अग्नहोत्रींकडे ‘या’ घटनांवर चित्रपट काढण्याची मागणी

The Kashmir Files

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात १९९० च्या दशकातील काश्मीरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. लोक या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांचे खूप कौतुक करत आहेत. तर ‘द काश्मीर फाईल्स’नंतर लोक आता इतरही काही घटनांवर चित्रपट काढण्याचा विवेक अग्निहोत्री यांना आग्रह करत आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच #TheKashmirfiles हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तर अनेकजण विवेक अग्निहोत्री यांना ‘द काश्मीर फाईल्स’ नंतर ‘द १९४७ फाईल्स’, रेल्वेत आग लागलेल्या घटनेवर आधारित ‘द गोधरा फाईल्स’, पोलिस फायरिंगवर आधारित ‘द कारसेवक फाईल्स’ आणि गॅस लीक घटनेवर ‘द भोपाल फाईल्स’ असे अनेक चित्रपट काढण्याची विनंती करत आहेत.

https://twitter.com/girishalva/status/1503010341793730565?s=20&t=Fxbpv115xaJCm7w5jWbhjQ

एकीकडे चित्रपटाचे कौतुक होत असताना दुसरीकडे अनेकजण या चित्रपटावर टीकाही करत आहेत. नुकतीच केरळमधील काँग्रेसने या चित्रपटावर टीका करत काही ट्विट्स केले. केरळ काँग्रसने ट्विट करत म्हटले की, ‘काश्मिरी पंडितांबाबत तथ्य – काश्मिरी पंडितांवर निशाणा साधणारे ते दहशतवादी होते. मागील १७ वर्षात (१९९०-२००७) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३९९ पंडित मारले गेले. याच काळात दहशतवाद्यांमार्फत मारण्यात आलेल्या मुसलमानांची संख्या १५ हजार आहे’.

https://twitter.com/DalipPancholi/status/1503046167076433921?s=20&t=sbn_6_KpOkv_6W4xskToTQ

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार चित्रपटाने शुक्रवारी ३.५५ कोटी, शनिवारी ८.५० कोटी आणि रविवारी १५.१० कोटी असे एकूण २७.१५ कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू असून येत्या दिवसात चित्रपट अधिक चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्ज रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटा मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावदी, पुनीत इस्सर यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या
बच्चन पांडे बनताना अक्षय कुमारची लागायची वाट; तब्बल ‘इतके’ तास लागायचे मेकअप करायला
काश्मिरी पंडितांवर बनलेल्या ‘द काश्मिर फाईल्स’वर पंतप्रधान मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now