सोशल मीडियावर विराटनंतर धोनीचे आहेत सर्वाधिक चाहते; पण धोनी इन्स्टावर तिघांनाच करतो फॉलो

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांचा आज वाढदिवस आहे. ICC च्या तीनही ट्रॉफी जिंकून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

महेंद्र सिंग धोनी हा भारतातला सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये ICC क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्र सिंग धोनीला उत्तम खेळाडू तसेच कॅप्टन कूल  म्हणून ओळखले जाते.

आज महेंद्र सिंग धोनी यांचा वाढदिवस असल्यामुळे, धोनी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. धोनीचा वाढदिवस एखादा सण असल्यासारखा साजरा केला जातो.

भारताचे सर्व स्टार खेळाडू सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. सचिन, विराटनंतर धोनी इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटरवर सर्वाधिक चाहते असलेला खेळाडू आहे.

मात्र धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह दिसत नाही. त्याने खूपच मोजक्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या आहेत. धोनीने गेल्या सहा महिन्यात फेसबुकवर फक्त १० पोस्ट केल्या आहेत.

त्याचबरोबर महेंद्र सिंग धोनी इन्स्टावर फक्त तीनच लोकांना फॉलो करतो. यामध्ये पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्याशिवाय बिग-बी अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.

इन्स्टाग्रामवर धोनीने त्याची लाडकी लेक झिवाचेही अकाउंट काढले आहे. त्याने झिवासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र त्याच्या इन्स्टा अकाउंटवर आतापर्यंत फक्त १०६ पोस्ट केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.