दिग्गज क्रिकेटपटूने मैदान सोडल्यावर धरली बॉलिवूडची वाट, ‘या’ चित्रपटात करणार लीड रोल

मुंबई। भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतनं मैदान सोडल्यानंतर आता बॉलीवूड पदार्पण करत असल्याची माहिती समोर आली आहे. एस श्रीशांत एका सिनेमात लीड रोल करणार असल्याचे समोर येत आहे. श्रीशांत पुन्हा दिसणार असल्याने त्याच्या या वापसीने आता त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

‘पट्टा’ नावाचा चित्रपटामध्ये त्याने कॉन्ट्रॉक्ट केलं असून त्यामध्ये लीड रोलमध्ये श्रीशांत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये श्रीशांत सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच आशा आहे.

श्रीशांत कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वामध्ये 2007मध्ये टी 20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्डकपसाठी खेळला होता. तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला होता. 2013मध्ये आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी लावली होती. ही बंदी गेल्यावर्षी उठवण्यात आली आहे.

त्यानंतर श्रीशांत कलर्स वरील बिग बॉसमध्ये झळकला होता. व त्यामुळे चाहते खूप खुश होते.मात्र आता बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यात असल्याने आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र तरीही श्रीशांत पुन्हा आयपीएल कधी खेळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या
आळशी स्वभावामूळे वडील सलीम खानचे ‘हे’ स्वप्न पुर्ण करु शकला नाही सलमान खान
जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? – निलेश राणे
मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात दुसऱ्यांदा बैठक
बाबो! १ कप चहाची किंमत १००० रुपये, काय आहे चहाची खासियत, जाणून घेऊयात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.