Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईत सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. त्यांनतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यासोबतची जुनी माणसं तर आहेतच, पण त्यात आणखी नवीनसुद्धा येत आहेत. म्हणजेच काय तर शिरूरमधील काही लोकं ढळली तरी काही अढळ लोकं माझ्यासोबत आहेत, असे म्हणत त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले की, ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे, तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोकं आढळली पाहिजे नाहीत. नाहीतर हा शिवनेरीचा अपमान आहे. मी मागेही बोललेलो होतो आणि पुन्हा आज बोलतो आहे की, आपल्याला ही देवाने दिलेली संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणे, खरे हिंदुत्व जोपासणे, टिकवणे, वाढवणे ही देवाने आपल्याला संधी दिलेली आहे.
तसेच मध्ये हिंदुत्वाचा एक तोतयेगिरीचा कळस करण्याचा प्रयत्न केला गेला. तोतयांचे बंड असे एक इतिहासात प्रकरण आहे. असेच काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून उपयोग नाही, हृदयात भगवा असायला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.
दसरा मेळाव्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱ्याला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. शिवतीर्थावर आपण भेटणारच आहोत. वाजत गाजत गुलाल उधळत तुम्ही येणारच आहात. परंतु, माझी एक विनंती आहे की, शिस्तीत या. कारण आपल्याकडून काही वेडंवाकडं करून घेण्याचा ते प्रयत्न करू शकतील. त्यामुळे सावध राहा.
आपल्याला लढाई जिंकायची आहे. मग ती लढाई कोर्टाची असो किंवा निवडणूक आयोगाची असो. आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनाची लढाई आपण जिंकलेलीच आहे. लोकांच्या भावना आपल्यासोबत तशाच ठेवा, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : “निवडणूक आयोगाने पक्षपातीपणाने निर्णय दिला तर शिवसैनिक रस्त्यावर उतरणार”
Eknath khadse : उद्धव ठाकरे नेमकं कुठे चुकले? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान!
Shivsena : उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका; मुंबईतील या दिग्गज नेत्याच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश
Uddhav thackeray : कोर्टाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना धोका नाही; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितला वेगळा अँगल