राष्ट्रवादीच्या आमदारानंतर भाजपच्या ‘या’ महिला आमदाराला झाला कोरोना

मुंबई | राष्ट्रवादीच्या आमदारानंतर भाजपाच्या महिला आमदाराला देखील आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरा भाईंदर भागातील भाजपच्या आमदार गीता जैन यांना कोरोना झाल्याचे समजले आहे. त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे.

रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर आमदार गीता जैन यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. गीता जैन यांच्या घरी फक्त त्यांचे पती असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने १० जुलैपर्यंत मिरा भाईंदर शहरात कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मिरा भाईंदर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. यावेळी अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकानेही बंद राहणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.