बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘हिट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao) आपल्या प्रेयसीसोबत म्हणजेच अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्नबंधनात अडकला होता. राजकुमार आणि पत्रलेखा ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.(After the marriage, Prince Rao became ‘this’; He said, ‘I have utensils and broom at home …’)
नुकतंच एका कार्यक्रमामध्ये अभिनेता राजकुमार रावने लग्न झाल्यानंतर आयुष्यात कोणते महत्वाचे बदल झाले, याबद्दल भाष्य केलं आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनेता राजकुमार रावने अनेक गुपिते उघड केली आहेत. ‘मी घरातील सर्व कामे करतो. मी घरी भांडी घासतो आणि झाडू देखील मारतो’, असे अभिनेता राजकुमार रावने कार्यक्रमात सांगितले आहे.
पत्नीला घरकामामध्ये मदत करतोस का? असा प्रश्न अभिनेता राजकुमार रावला या कार्यक्रमात करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता राजकुमार राव म्हणाला की, “मी माझ्या पत्नीला घरकामात मदत करतो. मी घरात सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागतो. मी चित्रपटांमध्ये नेहमी खऱ्याखुऱ्या भूमिका साकारतो. त्यामुळे घरात सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागणे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
“मी आणि माझी पत्नी एकत्र घरकाम करतो. मला सर्व गोष्टी नीटनेटक्या ठेवण्याची सवय आहे. त्यामुळे मी घरातील सर्व वस्तू नीट ठेवतो. मला भांडी घासायला आवडतात. तसेच मी घरी झाडू देखील मारतो. मी आणि पत्रलेखा घरातील सर्व कामे एकत्र करतो”, असे अभिनेता राजकुमार रावने या कार्यक्रमात सांगितले.
अभिनेता राजकुमार राव पुढे म्हणाला की, “मी लहान असताना माझ्या आईला घरकामात मदत करायचो. माझी आई घरातील सर्व कामे एकटी करायची. हे बघून मला खूप दुःख व्हायचं. त्यामुळे मी घरातील सर्व कामे करून ठेवायचो. लहानपणी मला घरामध्ये झाडू मारायला आवडायचे. तसेच लहानपणी मी भांडी देखील घासायचो”, असे अभिनेता राजकुमार रावने कार्यक्रमात सांगितले.
‘सिटी लाइट्स’ या चित्रपटाच्या दरम्यान अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी लग्न केले.
महत्वाचा बातम्या :-
भारताचा जगभरात डंका! भारतीय वंशाचा ‘हा’ व्यक्ती होऊ शकतो ब्रिटनचा नवा पंतप्रधान, वाचा त्याच्याबद्दल..
एकीकडे पाठिंबा दुसरीकडे विरोध! मनसेचे शिंदे सरकारला आव्हान, म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर..
शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ‘ती’ कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल