Share

Foxconn : फॉक्सकॉन गुजरातला पळवल्यामुळे मराठी माणूस भडकल्यावर नरमले मोदी; महाराष्ट्राला दिले ‘हे’ आश्वासन

Narendra Modi

Foxconn : वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉनचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर अनेक टीकाही करत आहेत.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दल एक माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या विषयावर फोनवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प आता गुजरातमध्ये स्थापन होणार आहे. जवळपास १ लाख नोकऱ्या या प्रकल्पातून उपलब्ध होणार होत्या. मात्र, आता तो गुजरातकडे गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मात्र, आता यावर उदय सामंत यांनी एक माहिती दिली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे या विषयावर फोनवर बोलणे झाले असता, महाराष्ट्राला वेदांत आणि फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे. यावेळी फॉक्सकॉनला तोडीस तोड किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचे आश्वासन मोदींनी शिंदेंना दिले आहे. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या कंपनीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर अचानक हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचे यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या
BJP : भाजपचा शिंदेंना दे धक्का! शिवसेनेचा आमदार असलेल्या अंधेरी विधानसभेसाठी भाजपने उमेदवार केला जाहीर
Vedant project : वेदांतामुळे १ लाखाचा लॅपटॉप मिळणार ४० हजाराला; चेअरमन अग्रवाल नेमकं काय म्हणाले? वाचा…
Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार

Vedanta project : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवालांनी केला खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now