Share

सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या जल्लोषावर बंडखोर संतापले, म्हणाले, ‘यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही…’

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने(bjp) जोरदार जल्लोष केला आहे.(After the fall of the government, the rebels got angry over the BJP’s outburst)

भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना मिठाई चारत महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचा आनंद साजरा केला होता. यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर संतापले आहेत. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या जल्लोषावर आक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने जल्लोष करणे योग्य नाही, अशा शब्दांत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी भाजपाला सुनावले आहे.

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या जल्लोषावर नाराजी व्यक्त केली आहे. “मी खरं सांगतो आम्ही हे सत्तेसाठी बंडखोरी केलेली नाही. मंत्रिपद असणारी लोकं कशाला बंड करतील? सरकार येतात जातात मात्र विचार टिकवायचा असतो, या सर्व भावनेतून हे घडले आहे”, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत.

बंडखोर आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले की, “यामध्ये उद्धव ठाकरे हे कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जो जल्लोष झाला त्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना भान बाळगले पाहिजे”, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

“आम्हाला सत्ता स्थापन करताना आमच्या नेत्याला दुखवायचं नाही. भावनांची कदर ठेवली पाहिजे. त्यामुळे प्रवक्त्यांनीच आपली भूमिका मांडावी. पक्षांनी जे काही अधिकृत प्रवक्ते निवडले आहेत, त्यांनीच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे. कोणाची मने दुखवायची नाहीत हे तत्व जसे आम्ही पाळतो तसे तुम्ही देखील पाळले पाहिजे”, असे देखील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील माहिती दिली. “सत्ता स्थापन होणारच आहे. फक्त सत्ता कधी स्थापन होईल याबद्दलची माहिती एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला देतील. एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना विचारूनच निर्णय घेतात. या गोष्टीचं खरंच कौतुक आहे.”, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
करेक्ट टायमिंग! महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट, चर्चांना उधाण
महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट
शेतकऱ्याला नांगरणी करताना शेतात सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा, क्षणात गावकरी गोळा झाले अन्…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now