Share

कौतुकास्पद! वडिलांचं निधन झाल्यानंतर नाही ठेवलं जेवण, त्याच पैशातून नदीवर बांधला पूल

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील कलुआही पोलीस स्टेशन हद्दीतील नरार पछवारी टोलाचे प्रकरण आहे. कलुआही पोलीस स्टेशन हद्दीतील नरर पछवारी टोला येथील रहिवासी महादेव झा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी गावातील डोकरा नदीवर पूल बांधला आहे. याची खूप चर्चा होत आहे कारण जेवणाच्या पैशातून त्यांनी हे काम करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

आता जो कोणी याबद्दल ऐकतो तो त्या मुलांची स्तुती करतो. महादेव झा यांच्या पत्नी माहेश्वरी देवी सांगतात की, त्यांच्या पतीने याबाबत पंचायत प्रमुखांना अनेकदा सांगितले होते, परंतु त्यांच्या म्हणण्याला प्राधान्य दिले गेले नाही. मरताना त्यांनी डोकरा नदीवर पूल बांधण्याची इच्छा मुलांसमोर व्यक्त केली होती, ती त्यांच्या मुलांनी पूर्ण केली.

महादेव झा यांचा मुलगा विजय प्रकाश झा ऊर्फ सुधीर झा याने सांगितले की, त्याचे वडील २०१९ मध्ये पावसाळ्यानंतर बाग आणि शेत पाहण्यासाठी जात होते. पूल नसल्यामुळे तो घसरून डोकरा नदीच्या गढूळ पाण्यात पडले, त्यात गंभीर जखमी झाले होते . तेथून घरी आल्यानंतर सर्व मुलांना बोलावून घेतले.

मृत्यूनंतर मेजवानीच्या मागे पैसे खर्च करण्यास नकार दिला. त्या मेजवानीच्या पैशातून डोकरा नदीवर लोकांसाठी पूल तयार करावा, असे सांगितले. वडिलांच्या इच्छेनुसार आणि आदेशानुसार मुलांनी पाच लाख रुपये खर्च करून पूल बांधून घेतला. मृत्यूनंतर, श्राद्धभोज आणि विधी कमी करताना थोडाच खर्च केला.

पाच लाख खर्च करून ग्रामस्थांसाठी आरसीसी पूल बांधला. मात्र, कोरोनामुळे पुलाच्या कामाला दोन वर्षांचा विलंब झाला. महादेव झा यांचे १६ मे २०२० रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. या पुलाच्या बांधकामामुळे सुमारे २००० लोकांना ये-जा करणे सोयीचे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा
या टीव्ही अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, जीन्सचे बटन खोलून केले बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फुटला घाम
राज्य सरकार अयोध्येमध्ये भव्य ‘महाराष्ट्र सदन’ बांधणार; आदित्य ठाकरेंनी केली घोषणा

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now