अक्षयकुमारच्या आईच्या निधनानंतर मोदी बुडाले प्रचंड दुखात; अक्षयला पत्र लिहून म्हणाले..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या आईचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. अक्षय कुमार ६ सप्टेंबरला आईला भेटण्यासाठी लंडनहून मुंबईला परतला. त्यानंतर ८ सप्टेंबरला त्याच्या आईचे निधन झाले. अभिनेत्रीच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडचे अनेक मोठे सितारे त्याला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते.

तसेच अनेक मोठ्या स्टार्सनी सोशल मीडियावर श्रद्धांजली पोस्ट लिहिली. अशा परिस्थितीत आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला शोक संदेश पाठवला आहे. जिथे अभिनेत्याने त्याच्याशी संबंधित एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाउटवर शेअर केली आहे.

अक्षय कुमारने पीएम मोदींचे शोक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात पीएम मोदींनी लिहिले, ‘प्रिय अक्षय, मला असे पत्र लिहिण्याची वेळ नसती आली तर बरे झाले असते. या जगात अशी वेळ कधीही कोणावर येऊ नये. तुझी आई अरुणा भाटिया यांच्या निधनाची बातमी ऐकून मला दुःख झाले आहे.’

पीएम मोदींनी अक्षय कुमारसाठी या विशेष पत्रात लिहिले की, “तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळाले आहे, तुम्ही तुमच्या जिद्दीने बॉलिवूडमध्ये तुमचे नाव निर्माण केले आहे. मला माहित आहे की तुम्ही योग्य मूल्ये आणि नैतिकता राखली आहे. ज्यातून तुम्ही सहजपणे संकटांना सामोरे जाऊ शकता आणि हा धडा तुमच्या पालकांकडूनच तुम्ही शिकले आहात.

जेव्हा तू तुझ्या करीयरची सुरुवात केली तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल पण मला खात्री आहे की त्यावेळी तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तिला सुनिश्चितच असे वाटत असेल की तु नेहमी दयाळू आणि नम्र रहावे.

पंतप्रधान मोदींचा हा संदेश सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “माझ्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या सर्व शोक संदेशांसाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. यासोबतच, वेळ काढून माझ्या पालकांबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. हे अतिशय सांत्वनदायक शब्द नेहमीच माझ्या सोबत असतील, जय अंबे. ”

१० सप्टेंबर रोजी म्हणजेच आईच्या निधनानंतर दोन दिवसांनी अक्षय कुमार आपल्या कुटुंबासह लंडनला रवाना झाला. अक्षय त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसला. अशा वेळी कोणत्याही निर्मात्याचे पैसे वाया जाऊ नयेत अशी अक्षयची इच्छा आहे. त्यामुळेच अभिनेत्याने शूटिंगला परत जाणे योग्य मानले. या कारणामुळे अक्षय सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला पण अक्षय कुमारसाठी काम सर्वात आधी आहे.

महत्वाच्या बातम्या-

येत्या काही दिवसात पावसाची राज्यभरात तुफान फटकेबाजी, ‘या’ जिल्ह्यांना जारी केले ऑरेंज अलर्ट
“मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, म्हणून मुख्यमंत्री नाही पंतप्रधान बदला”
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.