Share

करेक्ट टायमिंग! महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट, चर्चांना उधाण

bacchu kadu

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचा देखील समावेश आहे.(After the collapse of the Mahavikas Aghadi government, Bachchu Kadu got a clean chit in the road scam)

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आमदार बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीने आमदार बच्चू कडू यांच्यावर रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आमदार बच्चू कडू यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आला होता.

या सर्व प्रकरणात आमदार बच्चू कडू यांना क्लीन चिट मिळाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात पुरावे नसल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची फाइल बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आमदार बच्चू कडू हे अकोला जिल्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी . आमदार बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

आमदार बच्चू कडू यांनी रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार करत १ कोटी ९५ लाख रुपये लाटले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. आमदार बच्चू कडू यांनी अकोला जिल्याचे पालकमंत्री असताना जिल्हा परिषदेच्या अधिकारावर अतिक्रमण करत आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्याची कामे केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

यानंतर अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामांना स्थगिती दिली होती. या सर्व प्रकरणांमध्ये आमदार बच्चू कडू यांच्यावर अकोल्यातील सिटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर निकाल देताना रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले होते. राज्यपालांची परवानगी घेऊन आमदार बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले होते. पण आता आमदार बच्चू कडू यांना पोलिसांकडून या प्रकरणात क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट
शेतकऱ्याला नांगरणी करताना शेतात सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा, क्षणात गावकरी गोळा झाले अन्…
काॅंग्रेस राष्ट्रवादीमुळे नाही, तर ‘या’ गोष्टीचा राग शिंदेंच्या डोक्यात होता, त्यामुळे त्यांनी बंड केलं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now