गेले महिनाभर मी तीन कमिशनर व दोन एसपींना गुंगारा देत होतो; पकडल्यानंतर गजा मारणेची दर्पोक्ती

पुणे | फक्त दोन दिवसांसाठी घात झाला एवढ्या अंधारत गाडीपण ओळखली आणि मला पण ओळखलं तुमच्या माने साहेबांनी. मेढा पोलिस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट अशा शब्दात गजा मारणे याने पोलिसांच्या कामगिरीला सलाम ठोकला आहे.

गजा मारणे याने पुणे पोलिसांना चकवा देत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिस त्याच्या मागावर होते. यानंतर अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजाला मेढा पोलिसांनी अटक केली होती.

यानंतर गजा मारणे याला अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अशात माध्यम प्रतिनिधींनी मेढा पोलीस चौकीला गराडा घाताला होता. तेव्हा अटकेनंतर गजा मारणे याने बोलताना पोलिसांच्या कामगिरीला सलाम ठोकला आहे.

गजा म्हणाला, गेला महिनाभर मी तीन कमिशनर आणि दोन एसपींना गुंगारा देत होतो. मात्र, फक्त दोन दिवसांसाठी घात झाला. एवढ्या अंधारात गाडीपण ओळखली आणि मला पण ओळखलं तुमच्या माने साहेबांनी. मेढा पोलिस ग्रेट आणि माने साहेब पण ग्रेट…

बोलताना पुढे गजा म्हणाला, च्यायला दोन जामीन झाले. आणि एक जामीन नऊ तारखेला होणार होता. तोपर्यंत वकिलांनी पोलिसांपासून लपून राहायला सांगितले होते. फक्त दोनच दिवस राहिले होते. मात्र एवढ्या आडबाजूला येऊन पण पोलिसांना सापडलोच. ग्रेट मेढा पोलिस आणि ग्रेट तुमचे माने साहेब.

दरम्यान, टोळीयुध्दातून विरोधी गटातील दोघांचा खून केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षापासून मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे तब्बल दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली होती. या रॅलीमध्ये अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“मेल्यावर साहेबांना काय सांगू?” मराठी भाषेसाठी संतप्त दिवाकर रावतेंचा शिवसेनेला घरचा आहेर
सर्वे : बंगालमध्ये ममता दीदीची हॅट्रिक, तमिळनाडूत काँग्रेस आघाडी, वाचा ५ राज्यात भाजप कुठे?
वा रं मर्दा! आर्चीचा परश्या उतरला कुस्तीच्या मैदानात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.