‘त्या’ घटनेनंतर अक्षयकुमारने ठरवले की यापुढे आमिर खानसोबत काम करायचे नाही

आज ज्या अभिनेत्यांबदल आपण जाणून घेणार आहोत ते बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. गेल्या तीस वर्षांपासून हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.

एवढेच नाही तर या दोघांनी देखील त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एकत्र केली आहे. त्यानंतर या दोन्ही अभिनेत्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती.

पण त्यांनी एकत्र काम केले नाही. अजूनही या दोन्ही अभिनेत्यांनी एकत्र काम केले नाही. चला तर मग जाणून घेऊया या दोघांनी एकत्र काम का केले नाही? आपण इथे बोलत आहोत आमिर खान आणि अक्षय कुमारबद्दल

आज आपण या दोघांचा किस्सा जाणून घेणार आहोत. जाणून घेऊ कधी या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती? का दोघांनी एकत्र काम केले नाही? का अजूनही हे दोघे एकत्र काम करत नाहीत?

हे दोघेही बॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघेही आपल्या कामाबद्दल खुप मेहनती आहेत. पण या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे अक्षय कुमार वर्षभरात ३ ते ४ चित्रपट करतो. तर आमिर खान वर्षभरात एकच चित्रपट करतो.

या दोघांना १९९१ साली एका चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा आमिर खान बॉलीवूडचा सुपरस्टार झाला होता. कारण ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

या चित्रपटानंतर आमिर खान त्याच्या नवीन चित्रपटाची तयारी करत होता. हा चित्रपट होता ‘जो जिता वही सिकंदर’
या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानचा भाऊ मन्सूर खान करत होते. तर या चित्रपटाची निर्मिती आमिरचे अंकल नासीर हुसैन करत होते.

या काळात अक्षय कुमार फिल्म इंडस्ट्रीत नवीन कलाकार होता. त्याचा ‘सौगन्ध’ चित्रपट रिलीज झाला होता. अक्षय कुमार अनेक चित्रपटांसाठी या काळात ऑडिशन देत होता.

तेव्हा त्याला समजले की नासीर हुसैन एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात मुख्य भुमिकेत आमिर खान आहे. दुसऱ्या मुख्य भुमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. त्यावेळी अक्षयने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती.

ऑडिशन दिल्यानंतर या चित्रपटासाठी आपल्याला फोन येईल. तो अशी वाट बघत होता. त्याला फोन आला नाही आणि त्याला समजले की या भुमिकेसाठी दिपक तिजोरी ला फायनल करण्यात आले होते.

दिपक तिजोरी आमिर खानला कॉलेजच्या दिवसापासून ओळखत होता. त्या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे अमीर खानने दिपकला या चित्रपटासाठी फायनल केले होते.

अक्षय कुमारला जेव्हा समजले की दिपक तिजोरी आमिर खानचा मित्र आहे. म्हणून त्याला या चित्रपटात घेण्यात आले. तेव्हा त्याला खुप वाईट वाटले.

कारण या चित्रपटासाठी आमिरला जर त्याच्या मित्रालाच घ्यायचे होते. तर मग एवढ्या मुलांची ऑडिशन का घेतली? पण या अनुभवातून अक्षय कुमारला खुप मोठा धडा मिळाला होता.

यानंतर अक्षयने ठरवले की तो भविष्यात कधीही आमिर खानसोबत काम करणार नाही. आज ३० वर्षांनंतरही अक्षय आणि आमिरने एकत्र काम केले नाही.

आज हे दोघेही बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. ते आपल्या कामावर खुप प्रेम करतात. म्हणून ते आज सुपरस्टार आहेत.

२००८ मध्ये अक्षय कुमारला ‘सिंग इस किंग’ चित्रपटासाठी स्टार बेस्ट स्क्रीन अवॉर्ड मिळाले होते. याच वर्षी अमीन खानचा ‘गजनी’ चित्रपट देखील रिलीज झाला होता.

अक्षयला वाटले की या अवॉर्डचा खरा मानकरी आमिर खान आहे. त्यावेळी अक्षय कुमारने गजनी चित्रपटासाठी हा अवॉर्ड आमिर खानला डेडीकेट केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.