Indrani Mukherjee : शीना बोरा हत्याकांडात आता एक नवा खुलासा करण्यात आला आहे. २०१२ मध्ये शीना बोराची तिचीच आई इंद्राणी मुखर्जीने हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ मध्ये तिला अटक करण्यात आली असून सध्या ती जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे.
इंद्राणी मुखर्जी हिचे दोन लग्न झाले होते. तिच्या पहिल्या पतीपासून तिला शीना ही मुलगी झाली. त्यांनतर इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीशी दुसरे लग्न केले. राहुल हा पीटर मुखर्जीचा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. परंतु, राहुल आणि शीना या दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. ही गोष्ट इंद्राणीला पटत नव्हती.
त्यामुळे तिने तिचीच मुलगी शीना हिची हत्या केली असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान आता न्यायालयात इंद्राणीच्या वकिलांनी राहुलची उलटतपासणी केली. यावेळी त्यांनी राहुलला विचारले की, शीना तुझी बहीण असतानाही तू तिच्याशी संबंध का ठेवले?
इंद्राणीचे वकील रणजित सांगळे यांनी हा प्रश्न राहुलला विचारला. यावर राहुलने सांगितले की, माझे आणि शीनाचे नाते हे एकमेकांच्या संमतीने होते. तसेच इंद्राणीने शीनाला तिची बहीण म्हणून सांगितले असल्याचेही त्याने सांगितले.
माझे शीनाशी कोणतेच रक्ताचे नाते नसल्याने माझे तिच्याशी शारीरिक संबंध असल्याचे त्याने सांगितले. याआधी राहुलने एका गर्भवती महिलेचा अपघात केला असल्याचाही आरोप आहे. तसेच हे प्रकरण लपवण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
२०१५ पासून शीना ही आपली मुलगी नसून बहीण असल्याचे इंद्राणी मुखर्जी सांगत होती. मात्र, आता तिने शीना आपली मुलगी असल्याचे सांगितले आहे. या खुलाश्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
Anil Deshmukh : अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; मात्र पाळाव्या लागणार कोर्टाच्या ‘या’ अटी
Kolhapur : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून ३ मुलांच्या आईची निर्घुन हत्या, वाचून तुम्हालाही बसेल जबर धक्का
chandni chowk : कोणी बांधला होता चांदणी चौकातला पूल? काय होता त्या पुलाचा ३० वर्षांचा इतिहास? वाचा सविस्तर
Shinde group: …यामुळे अंधेरी विधानसभेची जागा शिंदे गटाने भाजपला सोडली; राजकीय वर्तुळात चर्चा