Homeक्राईमshocking! व्हायग्रा घेतल्यावर पत्नीने दिला सेक्स करण्यास नकार, पतीने उचचले टोकाचे पाऊल

shocking! व्हायग्रा घेतल्यावर पत्नीने दिला सेक्स करण्यास नकार, पतीने उचचले टोकाचे पाऊल

जगात अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. काही खुनाच्या घटना इतक्या विचित्र असतात की, विश्वासच बसत नाही की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कुणी कुणाचा जीव कसा घेऊ शकतो? इटलीतील एक खून प्रकरण सध्या चर्चेत आहे. यामध्ये एका 80 वर्षीय व्यक्तीने आपल्या 61 वर्षीय पत्नीची हत्या केली.

महिलेने ख्रिसमसच्या दिवशी पतीला सेक्ससाठी संमती दिली होती. यानंतर त्या व्यक्तीने एक शक्तिवर्धक गोळी खाल्ली पण औषध घेतल्यानंतर पत्नीने सेक्ससाठी नकार दिला. या कारणावरून त्या व्यक्तीने पत्नीचा जीव घेतला.

इटलीतील फॅनानो दी ग्राडारा येथे ही धक्कादायक हत्या घडली. 25 ते 26 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ६१ वर्षीय नतालिया किरिचुक हिच्या छातीवर तिचा नवरा ८० वर्षीय विटो संगिनी याने चार वेळा हल्ला केला होता. यामुळे नतालियाचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की महिलेने तिच्या पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता.

स्थानिक मीडियानुसार, जेव्हा त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला संबंध ठेवण्यास सांगितले तेव्हा तिने नकार दिला. याचा राग येऊन त्या व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार केला. महिलेचा मृतदेह घराच्या फरशीवर पडलेला मिळाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत सांगितले जात आहे की, पत्नीची हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीने सकाळी नाश्ता केला होता. त्यानंतर तो आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला आणि नेहमीप्रमाणेच सर्वांशी बोलला. यानंतर, दुपारी तो पुन्हा आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला, तेथे त्याने शेजाऱ्याला हत्येची माहिती दिली आणि पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. मात्र शेजाऱ्याने या प्रकरणापासून दूर राहून त्या व्यक्तीला पोलिसांना कळवण्यास सांगितले.

नंतर एक महिला नतालियाला शोधण्यासाठी आली पण त्या व्यक्तीने तिला हाकलून दिले. जेव्हा नतालियाच्या बॉसचा फोन आला तेव्हा त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की आता तो नतालियाशी कधीही बोलू शकणार नाही कारण त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

यासोबतच या व्यक्तीने नतालियाच्या बॉसवर आपल्या पत्नीवर रोमान्स केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर नतालियाच्या बॉसने पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. जेव्हा त्या व्यक्तीला हत्येचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीने व्हायग्रा घेतल्यावर सेक्स करण्यास नकार दिला होता. याच कारणावरून त्याने पत्नीची हत्या केली.

महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी