सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे धक्यातून सावरू शकेना; मैत्रीण आरती सिंहचा खुलासा

 

मुंबई। अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता ३ आठवड्या हून अधिक काळ उलटला आहे. मात्र तरीही त्याचा परिवार, त्याचे फॅन्स तसेच त्याचे इतर जवळील लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

सुशांतच्या जाण्याचा सर्वात मोठा धक्का अभिनेत्री अंकिता लोखंडेला बसला आहे. कारण ती ६ वर्षे सुशांतची गर्लफ्रेंड होती. सुशांतने केलेल्या आत्महत्येमुळे अंकिता पूर्णपणे खचली आहे.

ती सध्या एकटी राहणे पसंत करते तसेच ती स्वतः मध्येच हरवलेली असते. असा खुलासा अंकिताची मैत्रीण आरती सिंहने केला आहे. नुकतेच अंकिताची हालचाल विचारण्यासाठी बिग बॉस १३ ची स्पर्धक आरती सिंहने तिची विचारपूस केली.

आरतीने एका इंटरव्यू मध्ये याबाबत माहिती दिली आहे. आरती आणि अंकिता अनेक वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे अंकिताच्या कठीण प्रसंगी एक मैत्रीण म्हणून अंकिताची विचारपूस करणे हे कर्तव्य असल्याचे आरतीने सांगितले व तिने ते निभावले.

आरती ने सांगितले की, “अंकिता मुळे ती सुशांतला ओळखायची. तो खुप चांगला मुलगा होता व खूप मोटीवेटिंग सुद्धा होता. अंकिताला मी विचारले कि ती कशी आहे.

पण सध्या अंकिताला तिचा स्पेस हवा आहे आणि मीही तिला त्या स्पेस मध्ये राहू दिले. पण जेव्हापासून तिला सुशांतच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हापासून तिचे अश्रू थांबलेले नाहीत”.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आरती सिंहने काही जुने फोटो सुद्धा शेअर केले होते ज्यामध्ये सुशांत आणि अंकिता एकत्र पार्टीमध्ये मस्ती करताना दिसत होते. हे फोटो शेअर करून आरतीने सुशांतला श्रद्धांजली दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.