Eknath Shinde : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली आहे. शिवसेना कोणाची याबरोबरच अनेक मुद्द्यांवर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलासा दिला आहे. तर, ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्यात येत होता. त्यामुळे हे पक्षचिन्ह नेमके कोणाचे याबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.
ठाकरे गटाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाऊ नये अशा मागणीची याचिका केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. खरंतर लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत. आज विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बहुमत हे आमच्याकडेच आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच या देशात जे निर्णय होतात ते घटना, कायदे आणि नियमानुसारच होत असतात. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्याचा विचार करूनच विरोधी पक्षाची स्थगिती फेटाळली आहे. निवडणूक विभाग हादेखील एक स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळे काही गोष्टींचा निर्णय हा कोर्टात होतो तर काहींचा निर्णय निवडणूक आयोगाकडे होत असतो, असेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळे घटनातज्ञांना देखील आम्ही घेतलेला निर्णय हा कुठल्याही प्रकारे बेकायदेशीरपणे घेतला नाही, असेच वाटत होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, अपात्रतेची नोटीसच मुळात चुकीची होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांनी वाटेल त्या पद्धतीने नोटिसा दिल्या होत्या. अशा प्रकारच्या नोटिसा देण्याचा अधिकार त्यांना नव्हता. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात दिलेला निणर्याचे आम्ही स्वागत करतो.
महत्वाच्या बातम्या
supreme court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार; वाचा नेमकं काय घडलं?
Supreme Court : ..तेव्हाच उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावल्याचे सिद्ध झाले; सुप्रीम कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
Supreme Court : एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रश्न
सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेत परतणार? सेना नेतृत्वाचा ग्रीन सिग्नल