“हिरोसोबत झोपल्यानंतरच दोन मिनिटांचे आयटम सॉंग किंवा एक रोमँटिक सीन मिळत होता”

समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला होता. जया बच्चन यांनी सरकारकडे विनंती केली की, सरकारने हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभे राहावे.

जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांच्यावर अप्रत्यक्षपणे जया बच्चन यांनी निशाणा साधला होता. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि कंगणानेही या वादात उडी घेतली आहे.

कंगणाने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधत एक ट्विट केले आहे. जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कुठली थाळी दिली आहे. म्हणजे जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने काय काम केले आहे? एक थाळी मिळत होती.

त्या थाळीमध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर आणि एक रोमॅंटिक सीन मिळत होता. तो देखील हिरोसोबत झोपल्यानंतर. मी इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला आहे. माझी थाळी देशभक्ती आणि महिलाप्रधान चित्रपटांनी सजली आहे.

त्यामुळे ही माझी थाळी आहे जयाजी तुमची नाही. असं आणखी एक वादग्रस्त ट्विट कंगणाने केले आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अजून जया बच्चन यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.