विचित्र पण खरे! या विधीनंतर लग्नानंतर तीन दिवस वधू-वराला शौचालयाला जाता येत नाही

लग्नामध्ये अनेक वेगवेगळे विधी केले जातात. त्याचबरोबर लग्नात वेगवेगळे कार्यक्रम देखील पार पडत असतात. मात्र, एका समाजात लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत शौचालयास जात नाहीत. असे वेगळे विधी करण्यात येतात, जे एकूण सगळेच हैराण झाले आहेत.

द स्टारच्या वृत्तानुसार, लग्नानंतर हा अनोखा विधी इंडोनेशियातील तिडोंग नावाच्या समाजात केला जातो. या विधीबद्दल अनेक समज आहेत, ज्यामुळे लोक ते करतात. त्यामुळे, नवविवाहित जोडपे लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत शौचालयास जात नाहीत.

या प्रथेमागील श्रद्धा अशी आहे की, विवाह हा एक पवित्र सोहळा असतो. जर वधू आणि वर शौचालयास गेले तर, त्यांच्या पवित्रतेचे उल्लंघन होते आणि ते अपवित्र होतात. त्यामुळे वधू आणि वराला लग्नानंतर तीन दिवस शौचालयास जाण्यास बंदी असते.

जर कोणी असे केले तर ते एक वाईट अपशकुन देखील मानले जाते. एवढेच नाही तर हा विधी करण्यामागचे दुसरे कारण म्हणजे नवविवाहित जोडप्याला वाईट दृष्टिकोन पासून वाचवणे.

या समाजांच्या लोकांच्या श्रद्धेनुसार, जिथे आतड्यांची हालचाल असते तिथे घाण असते, ज्यामुळे तेथे नकारात्मक शक्ती असतात. असे देखील मानले जाते की, जर वधू आणि वर लग्नानंतर लगेच शौचालयास गेले तर त्यांच्यावर नकारात्मकतेचा परिणाम होऊ शकतो.

ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात, नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो आणि नवविवाहित जोडप्याचे लग्न देखील तुटू शकतो. लग्नाच्या तीन दिवसांसाठी वधू आणि वराला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये आणि जेणेकरून ते विधी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील.

यामुळे त्यांना कमी अन्न आणि पाणी दिले जातात आणि ते शौचालयास जाणार नाहीत याची काळजी देखील घेतली जाते. येथे हा विधी अत्यंत काटेकोरपणे पार पाडला जातो.

ताज्या बातम्या

मीराबाईच्या घराचा फोटो पाहून डोळे पाणावतील; तरीही मीराबाई म्हणते, गरीबी स्वप्नांमध्ये अडथळा ठरु शकत नाही

गोवा बलात्कार प्रकरण: मुली रात्रभर बीचवर काय करत होत्या?; मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याने देशभरात खळबळ

‘संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय’, स्वेच्छानिवृत्तीसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याचे पत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.