Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतीनंतर शिवसेना पक्षबांधणीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती. त्यांनतर या युतीमध्ये आता आणखी एका संघाचा समावेश झाला आहे. आणखी एक संघ शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची बातमी समोर आली आहे.
संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघानेसुद्धा आता या युतीला पाठिंबा देत शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अर्जुन तनपुरे यांनी सांगितले आहे.
तसेच पुढील काळात मराठा सेवा संघात मोठे फेरबदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यभर मराठा सेवा संघाचे एक कोटी सभासद आणि ३६ वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षात फेरबदल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्यासाठी राज्यभर मराठा सेवा संघाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच यापुढे मराठा सेवा संघाचा तरुण चेहरा पुढे असणार आहे. ही युती समवैचारिक युती असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आज मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मराठा सेवा संघ आपला नवीन चेहरा घेऊन येत असल्याची माहितीही अर्जुन तनपुरे यांनी दिली.
पक्षफुटीनंतर शिवसेनेला आपला पक्ष टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. तसेच ते ठिकठिकाणी सभाही घेत आहेत. यातच शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली. त्यांनतर आता मराठा सेवा संघालाही त्यांनी आपल्या पक्षात सामावून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
Tata Motors : येत आहे टाटाची नवीन Blackbird SUV, क्रेटा आणि नेक्सॉनचेही उडवणार होश
Virat Kohli : VIDEO : दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए! अहंकारी विराट अखेर सूर्यापुढे झुकला, Video मध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…
Hijab: हिंदी नाही हिजाब महत्वाचा; वडिलांनी आक्षेप केल्यानंतर इस्लामिक शाळेने मुलीला शाळेतून हाकलले
Nitish Kumar: बिहारनंतर आता ‘या’ राज्यात भाजपला बसणार झटका, नितीश कुमार घेणार मोठा निर्णय