रोहीत, पार्थनंतर पवारांच्या तिसऱ्या पिढीतील तिसरं नातवंडही राजकारणात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मुलीला राजकारण शिकवले. आणि सुप्रिया सुळे सध्या राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्या आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन मुलं. कन्या रेवती, तर सुपुत्र विजय. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे दर्शन कोणाला घडत नाही.

पण नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचा. या फोटोत रेवती सुळे पडेगावच्या ऊस संशोधन केंद्रात पाहणी करताना दिसत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर रेवती सुळे हिने राजकारणात एन्ट्री केली असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राजकारणात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हिट जोडीनंतर आता रोहित पवार आणि रेवती सुळे यांची हिट जोडी धमाका करणार असे चित्र दिसत आहे.

शरद पवार नेहमी आपल्या नातवंडांना महाराष्ट्रातील दौरे करत असताना बरोबर घेऊन जात असतात. त्यांना राजकारणाचे धडे देत असतात. आजोबांनी दिलेले धडे घेऊन रेवती सुळे आता राजकारणात एंट्री करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नवीन पर्व सुरू होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून डाॅक्टर सांगतात आईचे दुध न मिळू शकणाऱ्या बाळाला पाजावे बकरीचे दुध

मोठी बातमी! मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याच्या दृष्टीने पहीले पाऊल टाकले

दिशाने मृत्यूआधी १०० नंबर वर काॅल केला होता? पोलीस तपासात सत्य आले समोर

सुशांतला भीती होती रिया त्याला दिशाच्या केसमध्ये अडकवेल; कारण रियाला ‘ही’ गोष्ट माहीत होती..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.