Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून इतिहास रचणार आहेत. पेनी मॉर्डेंट यांनी दिवाळीच्या दिवशी शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यापदी सुनक यांची बिनविरोध निवड झाली आहे. ऋषी सुनक या ४२ वर्षीय माजी अर्थमंत्र्यांना जरी जिंकण्यासाठी किमान १०० खासदारांची गरज होती, तरी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचा त्यांना पाठिंबा होता.
१९२२ मध्ये प्रभावी संसदीय समितीचे प्रमुख सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी एक घोषणा केली. माघारीच्या शेवटच्या दिवशी स्थानिक वेळेनुसार २ वाजता त्यांनी संसदेच्या संकुलात घोषणा केली होती की, त्यांना फक्त एकच नामांकन मिळाले आहे. त्यामुळे अशाप्रकारे सुनकने नेता बनण्याची शर्यत जिंकली होती. सुनकचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यांचे वडील यशवीर हे भारतीय वंशाचे निवृत्त डॉक्टर आहेत आणि आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत.
https://twitter.com/PChidambaram_IN/status/1584535374910885888?t=l8WrXbnqOIIL0fDxCj1TJg&s=19
ऋषी सुनक पंतप्रधान होताच भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्विट केले की, ‘आधी कमला हॅरिस, आता ऋषी सुनक. अमेरिका आणि ब्रिटनच्या लोकांनी त्यांच्या देशातील बहुसंख्य नसलेल्या नागरिकांना सामावून घेतले आणि त्यांना सरकारमधील उच्च पदांवर निवडून दिले. मला वाटते की, भारताने आणि बहुतांश पक्षांनी हा धडा घेतला पाहिजे.”
https://twitter.com/ShashiTharoor/status/1584527502873333760?t=A_VvcTckLdKER_DAyxUKIg&s=19
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी ट्विट केले. ते म्हणाले की, “असे घडल्यास, अल्पसंख्याकातील एका सदस्याला सर्वात शक्तिशाली पदावर बसवून ब्रिटीशांनी जगात एक दुर्मिळ गोष्ट केली आहे, हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे, असे मला वाटते. आपण भारतीय ऋषी सुनक यांच्या विजयाचा आनंद साजरा करत आहोत, तेव्हा आपण प्रामाणिकपणे विचारूया: हे येथे (भारत) होऊ शकते का?”
सुनक यांचे अभिनंदन करताना आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, “आज, भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपले ७५ वे वर्ष साजरे करत असताना, युकेला भारतीय वंशाचे पंतप्रधान मिळाले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते. ऋषी सुनक यांचे अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा!”
https://twitter.com/MrsGandhi/status/1584535676472938496?t=I8itAgb800xAxvjO4ZG75w&s=19
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती गांधी यांनी ट्विट केले की, “दिवाळीच्या दिवशी ऋषी सुनक हे ब्रिटनमधील पहिले भारतीय वंशाचे, हिंदू पंतप्रधान म्हणून इतिहास घडवतील. अवघ्या 75 वर्षात फासे पलटतील असे कोणाला वाटले असेल!!” दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही सुनकचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, “एक ऐतिहासिक दिवस! ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दलऋषी सुनक यांचे अभिनंदन. ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांना तुमचा अभिमान आहे.”
https://twitter.com/adeshguptabjp/status/1584538046208229381?t=rGiURdUCCDyHdWKlP691PA&s=19
सुनक यांचे अभिनंदन करताना, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, “भारत हा अधिक सहिष्णु आणि सर्व धर्म, सर्व पार्श्वभूमी स्वीकारणारा असावा अशी माझी इच्छा आहे.” मोइत्रा यांनी ट्विट केले की, “ब्रिटिश आशियाईला १० व्या क्रमांकावर ठेवल्याबद्दल माझ्या दुसऱ्या आवडत्या यूके देशाचा अभिमान आहे. भारत अधिक सहिष्णू आणि सर्व धर्म, सर्व पार्श्वभूमी स्वीकारणारा असावा अशी इच्छा आहे.”
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले गैर-गोरे पंतप्रधान आहेत. सुनकच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश शासन असलेल्या भारतात झाला होता, परंतु त्यांचे जन्मस्थान आधुनिक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. त्यामुळे अशा प्रकारे, नवीन ब्रिटीश नेता हा भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही आहे. आतापर्यंत, त्यांच्या वंशाविषयीचा काही तपशील फक्त सोशल मीडियावर उपलब्ध आहे. ब्रिटनमधील कडवट राजकीय भांडणात, भारतीय आणि पाकिस्तानी दोघांनीही त्यांच्या सत्तेवर येण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान सुनक म्हणाले की, “मी तुम्हाला समस्या सोडवण्याची संधी मागत आहे. “ब्रिटन हा एक महान देश आहे, परंतु तो मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे आणि म्हणूनच मी पक्षाचा नेता आणि तुमचा पुढचा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहे.” ऋषी सुनक यांनी प्रामाणिक आणि जबाबदार राहण्याचे आश्वासन दिले. तसेच समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
udhav thackeray : राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, राजकीय समीकरण बदलणार
१०० रूपयांना सांगीतलेला आनंदाचा शिधा २०० रूपयांना पडणार, तेल गायब; सामान्यांची दिवाळी संकटात
Virat Kohli : तुला लाज वाटत नाही का? भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने केलेल्या ट्विटमुळे विराटचे चाहते भडकले
पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; वाचा रस्त्यात नेमकं घडलं काय?