शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(After removing the security of the rebel MLAs, Eknath Shinde got angry with the Thackeray government)
यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामधून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतले आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
या बंडखोर आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या ट्विटसोबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र देखील शेअर केले आहे.
या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही झालं तर यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरण्यात यावं असं देखील या एकनाथ शिंदे यांनी पत्राच्या माध्यमातून म्हंटलं आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, “आम्ही विधिवत निवडून आलेले आमदार आहोत. आमच्या निवासस्थानी असलेली आणि आमच्या कुटुंबियांना देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. हा एक सूड घेण्याचा प्रकार आहे. यामध्ये शिवसेनेचे काही नेते देखील समाविष्ट आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रात लिहिले आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि नाशिक मध्ये काही ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :-
आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा का काढली? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीय; बंडखोर आमदार भडकले
“आय लव्ह उद्धव. विषय कट”, बाॅलीवूड गायक लकी अलीची पोस्ट व्हायरल
बंडाच्या पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; सारवासारव करत म्हणाले..