प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय राऊंतानी काढली 3 शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत

मुंबई। राज्यातील राजकीय वातावरण हे आपण आतापर्यंत अनेक विषयांमुळे तापलेलं पाहिले आहे. कायम सत्ताधारी व विरोधक कोणत्या ना कोणत्या विषयावरून एकमेकांवर टीका करत असतात. व कायम वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. मात्र आता हेच वाद थेट शिवसेना भवन पर्यंत जाऊन पोहचले आहेत.

शनिवारी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी थेट वेळ पडली तर शिवसेना भवन फोडण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच भडकले आहेत. अशातच कायम चर्चेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांचा अगदी मोजक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

नेमकं प्रकरण काय पाहुयात

शनिवारी भाजपच्या दादरच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी प्रसाद लाड यावेळी म्हणाले की, वेळ आली तर सेनाभवन फोडू. व त्यानंतर प्रसाद लाड यांच्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले.

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मोजक्या ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली तर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी ट्विवमध्ये संताप व्यक्त केला आहे. साळवी म्हणाले की, ‘शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचं थोबाड फोडू,’ असं साळवी यांनी म्हटलं आहे.

‘शिवसेना भवन’ला हात लावणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्पं आहे असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे,’ अशी बोचरी टीकाही साळवी यांनी केली आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.