Eknath Shinde : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. त्यामुळे ते मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी भेट घेतली.
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची विचारपूस केली. त्यांनतर शिंदनेनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुखयमंत्र्यांनी राष्ट्रवादीतील एक माहिती सर्वांना सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डी येथे “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. पंरतु, शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी या शिबिराला ऑनलाईन हजेरी लावली.
त्यानंतर आता एकनाथ शिंदेनी पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याबद्दल एक माहिती सांगितली आहे. शरद पवार हे उद्या शिर्डीला शिबिरासाठी जाणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या गटातील एक आतली माहिती फोडली असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आता मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांची तब्येत चांगली आहे. ते उद्या शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर परत रुग्णालयात येऊन ते काही चाचण्या करतील व त्यांना डिस्चार्ज मिळेल. असे शरद पवार यांनी सांगितले असल्याचे शिंदे म्हणाले.
तसेच त्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून मी त्यांना सादिछा द्यायला आलो असल्याचेही यावेळी शिंदे म्हणाले. शरद पवार यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली असल्याचेही त्यांनी सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
kl rahul : केएल राहूलने गर्लफ्रेंड आथिया शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, तुच माझ्या…
ajit pawar : “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी”, अजित पवार स्पष्टच बोलले
shivsena : “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार…”, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
Amruta Fadanvis : भिडेंच्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “मला गुरुजींचा खूप….