कुठं कुठं जायाचं हनिमूनला! सिद्धार्थने केला ‘तो’ फोटो शेअर, अन्…

मुंबई | सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचबरोबर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर कोणत्या ठिकाणी फिरायला जाणार आहेत याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा आहेत. अशातच सिद्धार्थने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिताली मयेकरने क्लिक केला आहे. या फोटो पाहिल्यावर समजते आहे की लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले आहेत.

याचबरोबर नुकतेच लग्न बंधनात अडकलेल्या मितालीने एक निर्णय घेतला आहे. मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्येच एक बदल केला आहे. तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे.

लग्नाआधी मिताली मयेकर असे तिच्या अकाऊंटचे नाव होते. मात्र आता तिने मिताली मयेकर-चांदेकर असे नाव केले आहे. खास बाब म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मितालीने तिचं नाव बदलल्याने ती आता चांगलीच चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….
रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र
नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.