..म्हणून बोनी कपूरसोबत लग्न केल्यानंतरही श्रीदेवी दहा वर्षे त्याच्या घरी गेली नव्हती

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना होम ब्रेकर बोलले जाते. कारण त्यांचे विवाहित व्यक्तींसोबत अफेअर होते. काही अभिनेत्रींचे फक्त अफेअर होते. तर काही अभिनेत्रींनी लग्न देखील केले. पण लग्नानंतरही त्यांना होम ब्रेकर बोलले जाते.

अशाच एक अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्या सर्वांसोबत आहेत. श्रीदेवीला बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.

त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि सुंदरतेने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी फक्त बॉलीवूड नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. त्या साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री होत्या.

बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काही दिवसांमध्ये प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या सुंदरतेने अनेकांची हृदय जिंकून घेतली. बॉलीवूडमध्ये काम करत असताना श्रीदेवीची मुलाखत बोनी कपूरसोबत झाली. बोनी कपूर बॉलीवूडचे खुप मोठे निर्माते होते.

बोनी कपूर श्रीदेवीला पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना श्रीदेवीसोबत टाईम घालवायचा होता. म्हणून त्यांनी श्रीदेवीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मिस्टर इंडिया, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा अशा चित्रपटांमध्ये त्यांनी श्रीदेवीसोबत काम केले.

एकत्र काम करत असताना बोनी कपूर आणि श्रीदेवीमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. त्या दोघांना एकमेकांसोबत टाईम घालवायला आवडू लागले. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटासाठी श्रीदेवीच्या आईने दहा लाख रुपयांची मागणी केली होती.

त्यावेळी बोनी कपूरने अकरा लाख रुपये देऊन श्रीदेवीला चित्रपटामध्ये घेतले होते. ही त्यावेळची सर्वाधिक रक्कम होती. बोनी श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. पण अनेक वर्षे ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती. कोणालाही या गोष्टीबद्दल सांगितले नव्हते.

कारण श्रीदेवी तेव्हा मिथून चक्रवर्तीला डेट करत होत्या. म्हणून श्रीदेवी आणि बोनी कपूरची मैत्री मिथूनला आवडत नव्हती. मिथूनला या गोष्टीचा राग येत होता. मिथूनचा राग कमी करण्यासाठी श्रीदेवीने त्याच्यासमोर बोनी कपूरला राखी बांधली होती.

पण जेव्हा श्रीदेवी आणि मिथूनचे ब्रेकअप झाले. त्यावेळी श्रीदेवी बोनी कपूरच्या प्रेमात पडल्या. त्यांच्या आणि बोनी कपूरच्या नात्यामूळे त्यांना होम ब्रेकर बोलले जात होते. कारण बोनी कपूर अगोदरपासूनच विवाहित होते.

श्रीदेवीमूळे बोनी कपूरने त्यांची पत्नी मोना आणि लहान मुलांना सोडले होते. ही गोष्ट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. श्रीदेवीला होम ब्रेकर बोलले जाऊ लागले होते. श्रीदेवीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

याच कालावधीमध्ये श्रीदेवीच्या आईचे निध झाले. अशा परिस्थितीमध्ये बोनी कपूरने श्रीदेवीची साथ दिली. त्यांनी श्रीदेवीची काळजी घेतली. त्यांना एकटे सोडले नाही. श्रीदेवी खुप एकट्या झाल्या होत्या. पण बोनी नेहमी त्यांच्यासोबत होते. म्हणून त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

१९९६ मध्ये त्यांनी बोनी कपूरसोबत लग्न केले. श्रीदेवीसाठी बोनीने त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ही गोष्ट बोनीच्या घरच्यांना आवडली नव्हती. म्हणून श्रीदेवीला होम ब्रेकर बोलले जात होते. श्रीदेवीच्या बहिणीला देखील त्यांचे हे लग्न मान्य नव्हते.

लग्नानंतर श्रीदेवी बोनी कपूरच्या घरी जाऊ शकल्या नाहीत. कारण बोनीच्या पहिल्या पत्नी मोनाने ते घर सोडले नव्हते. त्यांची दोन्ही मुलं लहान होती. त्यांच्यावर या गोष्टीचा परिणाम होऊ नये. म्हणून त्यांनी घटस्फोटानतंरही बोनीचे घर सोडले नव्हते.

लग्नानंतर दहा वर्षे श्रीदेवी बोनी कपूरच्या घरी गेल्या नाहीत. त्या दुसरिकडे राहत होत्या. बोनी कपूरचा पहिला मुलगा अर्जुन कपूर श्रीदेवीसोबत कधीही बोलत नव्हता. कारण त्याच्या मते श्रीदेवी त्याच्या आईच्या गुन्हेगार आहेत.

श्रीदेवीमूळे अर्जुन कपूर त्याच्या वडिलांपासून लांब गेला होता. ही गोष्ट त्याला मान्य नव्हती. तो कधीही श्रीदेवीसोबत बोलत नव्हता. श्रीदेवी आणि बोनी कपूरला जान्हवी आणि खुशी दोन मुली झाल्या. २२ वर्ष श्रीदेवीने बोनी कपूरसोबत संसार केला.

२०१८ मध्ये श्रीदेवीचे निधन झाले. यामुळे सर्व फिल्म इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला होता. श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूरने परत एकदा त्याच्या वडिलांसोबत बोलायला सुरुवात केली. आज बोनी कपुर त्यांच्या चारही मुलांसोबत राहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

कंगनावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केला होता काळी जादू केल्याचा आरोप

…शेवटी आदित्य पंचोलीच्या धमक्यांना कंटाळून बोनी कपूरने पोलीस स्टेशनमध्ये केली होती तक्रार

लग्न करण्या अगोदर एक वर्ष लिव्हिन इनमध्ये राहावे लागेल; सुपरस्टारच्या सासूने ठेवली होती अट

महिमा चौधरीने सांगितले खरे कारण; म्हणाली मी बॉलीवूड सोडले नाही सोडावे लागले

आमिर खानने दिव्या भारतीसोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे घाबरलेली दिव्या तासंतास बाथरूममध्ये रडत बसली होती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.