…म्हणून मीनाक्षी शेषाद्रीने लग्नानंतर बॉलीवूड सोडले

बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्री आल्या. पण काही अभिनेत्रींची जादू कधीच कमी होऊ शकत नाही. या अभिनेत्रींनी खुप कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मीनाक्षी शेषाद्री बॉलीवूडमधल्या सर्वात हिट अभिनेत्री आहेत.

यातलेच एक नाव म्हणजे मिनाषी शेषाद्री. मिनाषी शेषाद्रीने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती. ८० आणि ९० च्या दशकाबद्दल जेव्हा जेव्हा बोलले जाईल तेव्हा तेव्हा मिनाषी शेषाद्रीचे नाव नक्कीच घेण्यात येईल.

पण त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड नव्हती. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्यच वाटेल. पण हे खरे आहे. मीनाक्षी यांना अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. त्यांना अभिनयाची आवड नव्हती. म्हणून त्यांनी कधीच अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नाही.

मीनाक्षीचा जन्म झारखंडमध्ये झाला होता. त्यांनी लहानपणापासूनच नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. मीनाक्षी यांनी वयाच्या १७ व्या वर्षी मिस इंडीयाचा ताज जिंकला होता. पण पुढे काय करायचे याचा निर्णय त्यांनी घेतला नव्हता. त्यांचे खरे नाव शशिकला शेषाद्री होते.

चित्रपटांमध्ये येण्या आगोदर त्यांनी हे नाव बदलले.
मिस इंडीयाची स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांचे फोटो सगळीकडे लावण्यात आले होते. यातलाच एक फोटो मनोजकुमार यांनी पाहिला. त्यांना पाहताच मनोजकुमार यांनी त्यांच्या ‘पेंटर बाबू’ या चित्रपटासाठी साईन केले.

पण ‘पेंटर बाबू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला सोडण्याचा निर्णय घेतला. या कालावधीमध्ये सुभाष घई यांनी त्यांना ‘हिरो’ चित्रपटाची ऑफर दिली.
हिरो चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त हिट झाला.

त्यानंतर मीनाक्षी रातोरात बॉलीवूडच्या सुपरस्टार झाल्या होत्या. त्यांनी होशीयार, बेवफाई, महागुरु, देहलीझ, दिलवाला, परिवार, गंगा जमूना सरस्वती, शंहशाह, जोशीला, घर हो तो ऐसा, घायल, घातक अशा चित्रपटांमध्ये काम केले.

मीनाक्षी यांच्या अभिनयाने आणि सुंदरतेने अनेकांना भुरळ घातली होती. मीनाक्षी यांनी श्रीदेवीला देखील चांगलीच टक्कर दिली होती. बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश झाला होता. त्यांच्या करिअरमधला अजून हिट चित्रपट यायचा बाकी होता.

‘दामिनी’ हा त्यांच्या फिल्मी करिअरमधला सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि ऋषी कपूर या दोघांनी देखील काम केले होते. मीनाक्षीने त्यांच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. ८० ते ९० च्या दशकामध्ये त्यांनी अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट केले.

पण त्यांना दामिनी चित्रपटासाठी ओळखले जाते. दामिनी चित्रपटाने त्यांना प्रसिद्धीच्या नव्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते. त्यानंतर त्यांनी खुप कमी चित्रपट केले. १९९६ साली रिलीज झालेला ‘घातक’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

या चित्रपटानंतर त्या कोणत्याही चित्रपटामध्ये दिसल्या नाहीत. एवढेच काय तर त्या बॉलीवूडपासूनच लांब गेल्या. १९९५ मध्ये त्यांनी गुंतवणूक बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले आणि अमेरिकेच्या टेक्सास शहरात स्थायिक झाल्या.

त्यांना लग्नानंतर पुर्ण लक्ष त्यांच्या संसाराकडे द्यायचे होते. म्हणून त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. त्यांनी अमेरिकेत स्वतः ची डान्स अकॅडेमी सुरू केली आहे. त्या तिथे भारतीय नृत्य शिकवतात.

लग्नानंतर त्या बाहेर देशात राहायला गेल्या. त्या पुर्णपणे लाईमलाईटपासून लांब राहतात. त्यांनी बॉलीवूड सोडले असून त्या त्यांच्या संसारात सुखी आहेत. एकेकाळी बॉलीवूडमध्ये राज्य करणाऱ्या अभिनेत्री आज लाईमलाईटपासून पुर्णपणे लांब आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

त्या दिवशी सनी देओल महेश भट्टला म्हणाला की, तुम्ही फक्त नावाला दिग्दर्शक आहात

…म्हणून ऐश्वर्या राय नेहमी आराध्याचा हात पकडून असते

बाॅलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घातलाय सोन्याचा ड्रेस; किंमत ऐकल्यावर वेडे व्हाल..

सिनेमा सुद्धा फिका पडेल इतकी नाट्यमय लव्हस्टोरी आहे स्मिता पाटील व राज बब्बरची

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.