एवढ्या वर्षांनी झील मेहताने सांगितले ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सोडण्या मागचे कारण

काही मालिका टेलिव्हिजनवर खुप प्रसिद्ध आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. गेले बारा वर्षे ही मालिका न थांबता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एवढी वर्षे झाली तरी या मालिकेची प्रसिद्धी कमी झाली नाही. प्रेक्षक आजही खुप आवडीने ही मालिका पाहतात.

गेल्या बारा वर्षांमध्ये या मालिकेत अनेक बदल झाले आहेत. या मालिकेत भुमिका निभावणाऱ्या कलाकारांमध्ये देखील वेळोवेळी बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या मालिकेत सुरुवातीला सोनूची भुमिका निभावणाऱ्या झील मेहताबद्दल सांगणार आहोत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका २००८ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी या मालिकेत लहान सोनूची भुमिका अभिनेत्री झील मेहताने निभावली होती. प्रेक्षकांना या भुमिकेला खुप जास्त प्रेम दिले होते. खुपच कमी वेळात झीलला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती.

तिने वयाच्या नवव्या वर्षी या मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. चार वर्षे झीलने ही भुमिका निभावली आणि प्रेक्षकांनी देखील या भूमिकेवर भरभरून प्रेम केले. पण त्यानंतर चार वर्षांनी झीलने ही मालिका सोडली.

ही मालिका सोडली त्यावेळी झीलचे वय चौदा वर्षे होते. झीलने मालिका सोडली तेव्हा त्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. एवढ्या वर्षांनंतर झीलने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने ही मालिका का सोडली यामागचे खरे कारण सांगितले.

झील म्हणाली की, ‘मी खुप कमी वयात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या गोष्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर होत होता. म्हणून मी दहावीची तयारी करण्यासाठी आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ही मालिका सोडली होती. त्यानंतर मी माझ्या अभ्यासावर लक्ष दिले’.

मालिकेतील भुमिके प्रमाणेच झील खऱ्या आयुष्यात देखील अभ्यासात अतिशय हुशार होती. तिला दहावीला ९३% टक्के मिळाले होते. अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्यानंतर झीलने तिचे शिक्षण पूर्ण केले. आज ती चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहे.

झील मेहता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती आत्ता खुपच सुंदर दिसते. झीलच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आहेत. जे नेहमीच व्हायरल होत असतात. तिला चांगली संधी मिळाली तर ती परत अभिनय क्षेत्रात प्रवेश करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ खानमूळे दिव्या भारती रडत होती

‘धडकन’ चित्रपटातील अभिनेत्रीसोबत झाला होता भयानक अपघात; त्यामुळे आयुष्य झाले खराब

पहिल्या चित्रपटामध्ये असे काय झाले की, सलमान खानने घेतला एवढा मोठा निर्णय

दिलीप कुमारमूळे गोविंदा २५ चित्रपट गमवावे लागले होते; कारण ऐकून तर विश्वास नाही बसणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.