अवघ्या एका दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेला माजी भारतीय फुटबॉलपटू मेहताब हुसैन आता राजकारणातून बाहेर पडणार आहे. मेहताबने २४ तासापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मिडफील्ड जनरल या नावाने प्रसिद्ध असलेल्या मेहताबने असा निर्णय का घेतला याबद्दल चर्चा सुरू आहे. ईस्ट बंगालचा माजी कर्णधार असलेल्या मेहताबला प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाचा झेंडा हाती दिला होता.
मेहताबच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली होती. पण त्यानंतर फक्त २४ तासात त्याने निर्णय बदलला.
मेहताबने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, आजपासून मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
राजकारणातील प्रवेशाच्या निर्णयाबद्दल मी सर्व चाहत्यांची माफी मागतो. मी अचानक घेतलेल्या राजकीय निर्णयामुळे कुटुंबातील सदस्य आणि चाहते यांना त्रास झाल्याचे त्याने म्हटले आहे.
राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय मी कोणाच्याही दबावामुळे घेतला नाही. राजकारणापासून दूर राहण्याचा माझा वैयक्तीक निर्णय आहे असल्याचे त्याने सांगितले.
मी राजकारणात यासाठी आलो होतो की मला लोकांशी जोडायचे होत. असेही त्यांनी म्हटले आहे.