आयकर विभागाच्या धाडीनंतर पहील्यांदाच सोनू सूदने सोडले मौन; प्रतिक्रीया वाचून थक्क व्हाल

15 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयासह 6 ठिकाणी छापेमारी केली होती. एका रिपोर्टनुसार, आयकर विभाग सोनू सूदच्या सर्व आर्थिक कागदपत्रांची कमाई आणि खर्चाची छाननी करत आहेत.

आयटी विभागांनी असा दावा केला होता की सोनू सूदशी संबंधित असलेल्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर, 20 कोटी रुपयांची करचोरी , 65 कोटी रुपयांचे फसवे व्यवहार, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त अवैध विदेशी निधी आणि जयपूरमधील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत 175 कोटींचा घोटाळाही केला आहे.

सोनू सूदने या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याचे मौन सोडले आहे. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “प्रत्येकवेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. कारण काळ सर्व सांगतो.

सुदैवाने मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी आणि मनापासून भारताच्या लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया अनमोल जीवन वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी दिला आहे. अनेक प्रसंगी मी जाहिराती देणाऱ्या ब्रँड्सनाही माझी फी दान देण्यास प्रोत्साहित केले आहे. जेणेकरून पैशांची कमतरता भासू नये.

गेले चार दिवस मी माझ्या घरी आलेल्या काही पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होतो. म्हणूनच तुम्हाला मदत करू शकलो नाही. परंतु आता पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी परत आलो आहे.’ कर भला, हो भला, अंत भले का भला… मेरा सफर जारी रहेगा,

कोरोनाच्या काळात, सोनू सूदने अनेक गरजू लोकांना मदत केली होती. शहरातून त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्यास त्याच्या खर्चाने विमानसेवा तसेच बस सेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच त्याने वैद्यकीय मदतही केली होती. याशिवाय तो सतत लोकांना मदत करत असतो.

 

महत्वाच्या बातम्या
साऊथ सुपरस्टार थालापथी विजयने आपल्याच आईवडिलांच्या विरोधात केली केस, हे आहे कारण
“देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”
“किरीट सोमय्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर दुसऱ्या दिवशी सरकार बरखास्त होईल”

मुंबईहून दिल्लीला अवघ्या १२ तासात पोहोचाल, जाणून घ्या नितीन गडकरींच्या मेगा प्रोजेक्ट बद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.